इंधन दरवाढीविरोधात युवा सेनेच्या वतीने थाली बजाओ खूशियां मनाओ आंदोलन

जालना,३ एप्रिल / प्रतिनिधी :- जालना शहरातील डी. सी. पेट्रोल पंप, मुथ्था बिल्डिंग जवळ वाढत्या इंधन दरवाढीविरोधात युवा सेनेच्या वतीने “थाली बजाओ खूशियां मनाओ” आंदोलन करण्यात आले.

युवासेना विभागीय सचिव तथा विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व इंधन दरवाढ साजरी करण्याकरिता अनोखा आनंद सोहळा साजरा केला.

अभिमन्यू खोतकर

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे,उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकूर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश मोहिते,शिवसेना उप तालुकाप्रमुख राजेश जाधव, उप तालुकाप्रमुख अभिजीत साळवे, युवासेना शहरप्रमुख योगेश रत्नपारखे,दुर्गेश काटोटीवाले,विक्रम कुसुंदल,युवतीसेना जिल्हाप्रमुख सीमा पवार, ज्योती बोर्डे ,अंजली मगरे ,भरत कुसुंदल,भोला कांबळे, लखन कनिसे,अभिषेक वायाळ,दिनेश भगत,ताहेर खान,बडे खान,बाळु भिसे, सुशील भावसार,दिपक वैद्य,संतोष परळकर,अमोल दुसाने,देवेंद्र बुंदुले,विक्रम चव्हाण,अभिषेक काबलीये,शुभम टेकडे,काशिनाथ जाधव,राजू जाधव,संदीप घारे,गौरव नवगिरे,प्रमोद फुल्लेडवाड,कृष्षा सुराशे यांच्यासह युवासेना पदाधिकारी,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.