वैजापूर तालुक्यातील कविटखेडा, वळण व मनोली येथे विविध विकास कामांसाठी 28 लक्ष रुपये निधी मंजूर

आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमिपूजन

वैजापूर,३१ मार्च /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील कविटखेडा, वळण व मनोली येथील विविध विकास कामांसाठी 28 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते गुरुवारी झाले.
 कविटखेडा येथे गावअंतर्गत सिमेंट रस्ता (5 लक्ष रुपये) व स्व.माणिकराव शिंदे प्रवेशद्वार (3 लक्ष रुपये) या कामांचे भूमिपूजन तसेच स्थानिक विकास निधीतून मौजे वळण येथे डांबरीकरण रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण(15 लक्ष रुपये) व मौजे मनोली-सहानगाव रस्ता खडीकरण (5 लक्ष रुपये) रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन अशा एकुण 28 लक्ष रुपये निधीच्या मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव, उपतालुकाप्रमुख गोरख पाटील आहेर, माजी उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, विभागप्रमुख भिकन पाटील सोमासे, उपविभागप्रमुख अंबादास  खोसे, अरुण मगर, प्रकाश वाघ, सरपंच अनिल कुळधर, राजेंद्र काटे, भरत साळुंके, कचरू सुर्वे, चंद्रकांत पवार, राधाकिसन भागवत, बाळासाहेब कुंदे, किशोर आप्पा हुमे, संजय कुंदे, निजामभाई, दिपकभाऊ वाघ, बाबासाहेब चव्हाण, बापुसाहेब निकम, संतोष निकम, विशाल सरोवर, निलेश निकम, निवृत्ती साताळकर, सुनिल जाधव, नवनाथ निमसे, हरिभाऊ साळुंके, राहुल सोनवणे, योगेश शिंदे, परमेश्वर जाधव, निवृत्ती पवार, विलास भोपळे, नवनाथ पवार, आत्माराम शिंदे, प्रविण पवार, सुनिल सुर्यवंशी, कचरू सुर्यवंशी, भाऊसाहेब सूर्यवंशी, निवृत्ती सुर्यवंशी, बाबुराव सुर्यवंशी, विजय चव्हाण, समाधान सुर्यवंशी, सिताराम सुर्यवंशी, गणेश तुपे, गणेश सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, लक्ष्मण भागवत, रावसाहेब सूर्यवंशी, साईनाथ सोनवणे, सुनिल सूर्यवंशी, ताराचंद जाधव, हरिभाऊ सूर्यवंशी, दिनकर पवार, नवनाथ सुर्यवंशी, गोरख सुर्यवंशी, कारभारी भागवत, आप्पासाहेब सुर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, बालचंद सुर्यवंशी, उत्तमराव दांडगे, भाऊसाहेब भागवत, साहेबराव भागवत, देवीदास चव्हाण, रविंद्र सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.