हिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रेस परवानगी द्या-शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे पोलिस आयुक्तांना निवेदन

गुलमंडी येथे हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना उभारणार गुढी

औरंगाबाद ,३१ मार्च /प्रतिनिधी :- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी हिंदू नववर्ष समितीतर्फे गुढीपाडवा निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात येते. १७ वर्षांची परंपरा मध्यंतरी कोरोनामुळे २ वर्षे स्थगित केली होती. मात्र यावर्षी हिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रेस परवानगी द्यावी. अशी मागणी संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार आंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडेय, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, उपशहरप्रमुख जयसिंह होलीये, नारायण कानकाटे, शेख अतिक आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी वरिष्ठांना निवेदन पाठवत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही पोलिस आयुक्तांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिली.

गुलमंडी येथे हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना उभारणार गुढी

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिंदु नववर्षानिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे ह्रदयस्थान गुलमंडी चौकात हिंदू नववर्षनिमित्ताने शिवसेना भव्य गुढी उभारुन गुढीपाडवा व हिंदु नववर्ष साजरा करण्यात येणार आहे.शनिवार, २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्य हस्ते ध्वजारोहण करुन गुढी उभारण्यात येणार आहे.