कवयित्री अनुराधा पाटील यांना कविता गौरव तर प्राचार्य राम भाले यांना जीवन गौरव

ऊर्मिचे पुस्कार जाहीर, पाडव्याला होणार वितरण सोहळा

जालना ,३१मार्च /प्रतिनिधी :- जालना येथील ऊर्मिच्या वतीने दिला जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यंदा कवयित्री अनुराधा पाटील यांना कविता गौरव तर प्राचार्य राम भाले यांना जीवन गौरव पुस्कार ऊर्मिते अध्यक्ष प्रा. जयराम खेडेकर यांनी गुरूवारी आजोयित पत्रकार परिषदेत जाहीर केले आहेत.

या पत्रकार परिषदेस सचिव सुभाष कोळकर, ज्ञानेश्वर भांदरगे, शरद देशमुख  उपस्थिती होतेयावेळी  खेडेकर म्हणाले, की मागील पंचवीस वर्षांपासून ऊर्मिच्या वतीने शब्द शिल्प, काव्याच्या योगदानासाठी पुरस्कार देऊन समान्मा केला जातो. यंदा कवितेच्या समग्र योगदानासाठी प्रतिभावंत कवयित्री अनुराधा पाटील यांना तर शिक्षण क्षेत्रातील महदनीय योगदानासाठी प्राचार्य राम भाले यांना राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाले आहे. प्रत्येकी एक लाख रूपये रोख, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ, सन्मानपत्र देऊन डॉ. सुधीर रसाळ यांच्या  हस्ते  सत्काराचे आयोजन केले आहे.

कवयित्री अनुराधा पाटील यांनी अत्यंत सयत, संयमी आणि मितव्ययी शब्दात कवितेतून स्वत:ला अभिव्यक्त केले आहे. कमी पण चांगले , नीटनेटके आणि परिणामकारक काव्य त्यांनी निर्मिती त्यांनी केली असून अनेक संस्थांचे आणि शासनाचे पुरस्कार त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा महाराष्ट्र शासन, साहित्य अकादमी, दिल्ली यांनी त्यांना सन्मानीत करुन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.

प्राचार्य राम भाले यांनी जालना शहराच्या शैक्षणिक व साहित्यीक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक तीर्थ म्हणून ऊर्मीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार घोषीत करून त्यांच्या समग्र योगदानासाठीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक, उत्तम प्रशासक आणि संवेदनशील माणूस व संस्कार प्रबोधिनी या नामांकीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांची मुद्रा अमिट आहे.

पुरस्कारप्राप्त प्रतिभावंतांच्या कौतुक सोहळ्यानंतर शब्द वेड्या कलावंतांची धुंद काव्यमैफल आयोजित केली आहे. या काव्यमैफलीच्या अध्यक्षस्थानी कविवर्य फ . मुं . शिंदे, कविता बोरगावकर, डॉ . शिवानंद भानुसे, सुनंदा पाटील, हे असणार असल्याचे  खेडेकर यांनी सांगितले. हा पुरस्का सोहळा व काव्यमैफल दोन एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता संस्कार प्रबोधिनी येथे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.