केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची वैजापूरला भेट ; चहाचा अस्वाद घेत भाजप कार्यकर्त्यांशी केली विविध विषयांवर चर्चा

वैजापूर,२८ मार्च  /प्रतिनिधी :- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी शिर्डीला जाताना रस्त्यात वैजापूर शहरात काही काळ थांबून भाजप कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.

जिल्हा दुध संघाचे संचालक कचरू पाटील डिके यांनी त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी श्रीकृष्ण वडापाव सेंटरवर चहाचा स्वाद घेत कार्यकर्त्यांशी तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.याप्रसंगी भाजप कार्यकर्ते तथा जिल्हा दुध संघाचे संचालक कचरू पाटील डिके यांच्याशी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. नगरसेवक शैलेश चव्हाण, दशरथ बनकर, गणेश खैरे, उद्योग आघाडीचे कैलास पवार, सूर्यकांत सोमवंशी, निलेश पारख, शैलेश पोंदे, संदीप पवार, गौरव दोडे, गिरीश चापानेरकर, सन्मित खनिजो आदी यावेळी उपस्थित होते.