लोणी खुर्द उपसरपंचपदाच्या चुरशीच्या लढतीत गजाला सय्यद यांचा विजय

महिला विरुद्ध पुरुष लढाईत महिलेची सरशी

वैजापूर ,१२ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील उपसरपंच पदाच्या चुरशीच्या लढतीत भाऊसाहेब जाधव यांचा पराभव करत गजाला अरिफ सय्यद यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. आप्पासाहेब जाधव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसापासून लोणी खुर्द येथील उपसरपंच पद रिक्त होते.

बुधवार दिनांक 9 मार्च रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालय लोणी खुर्द येथे उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत गजाला सय्यद यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. लोणी खुर्द येथील ग्रामपंचायत मध्ये आता पर्यंत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नव्हते ,गजाला सय्यद यांनी आज उपसरपंच पदावर विजय मिळवला असल्याने समाजात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

लोणी खुर्द हे गाव मोठ्या बाजारपेठ चे गाव असल्यामुळे येथे नेहमी ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये चुरस बघायला मिळते. या वेळीही अशाच प्रकारची चुरस बघायला मिळाली चार विरोधात पाच अशा एक मताच्या फरकाने हा विजय मिळाला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही शांततेच्या मार्गाने पार पडली आहे.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एल. पी. जयसिंगपूरे, तलाठी राहुल लखवाल व ग्रामविकास अधिकारी एस. आर.दिवटे यांनी तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम पार पाडले.

या विजयामुळे गजला सय्यद यांचे भिकन सोमासे, रिखब पाटणी, उत्तमराव निकम, रउफदादा सय्यद, सचिन कुमावत,राधाकृष्ण सोनवणे, आप्पासाहेब जाधव, उत्तमराव जाधव, मदनराव जाधव, काशिनाथ सोनवणे, पंढरीनाथ पवार, सोपान जाधव, निजाम सय्यद, खाजू सय्यद, दादाभाई सय्यद, एन.डी .पाटील, अनिल पवार, प्रदीप जाधव, राजेंद्र बागुल, राहुल पवार, दीपक बागुल, जमादार सय्यद, हसन सय्यद, तैमूर सय्यद यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.