लाच घेताना वैजापूर ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हुकूमसिंग डांगर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

वैजापूर,२२ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेली बियर बार हॉटेल सुरळीत चालू देण्यासाठी व हॉटेलवर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून 20 हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारतांना वैजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हुकूमसिंग दौलतसिंग डांगर (वय 57 वर्ष) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापडा रचून पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक  मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, पोलीस अंमलदार साईनाथ तोडकर, मिलिंद इप्पर व  केवलसिंग गुसिंगे यांच्या पथकाने सापडा रचून ही कारवाई केली.