जागतिक महिला दिनानिमित्त 175 जेष्ठ महिलांचा वैजापुरात सन्मान

वैजापूर ,८ मार्च / प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनानिमित्त शहरात सुरू असलेल्या श्री साई सच्चरीत पारायण सोहळ्यात सहभागी 175 जेष्ठ महिला नागरिकांचा वैजापूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती यांच्यावतीने आज साडी प्रदान करून सत्कार करण्यात आला.

Displaying IMG-20220308-WA0091.jpg

येथील मर्चंट बँक चेअरमन व साई उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल संचेती व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास साखरे व सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांच्या हस्ते शहरातील जेष्ठ महिला श्रीमती विमलबाई काटकर, श्रीमती शोभाबाई राजपूत, चंद्रभागाबाई गायकवाड, गंगाबाई राजपूत यांना प्रातिनिधिक स्वरूपात साडी प्रदान करून उर्वरित महिलांना साडी प्रदान करून जागतिक महिलादिन  साजरा करण्यात आला.

याप्रसंगी पारस घाटे, महेंद्र काटकर, सचिन राजपूत, उमेश राजपूत, मेहुल पोकर्णे, अण्णा अधिकारी, श्रीनिवास सोनवणे, सतीश जाधव, ऋतिक राजपूत, देवा भाटिया, मनोज दोडे, राजेंद्र लालसरे, जितेंद्र चापानेरकर, गोविंद दाभाडे, काशीनाथ भावसार, मालन शिंदे, श्रीमती पवार, श्रीमती बहिरट, श्याम उचित, बाबासाहेब गायकवाड, यांच्या सहसाई भक्त उपस्थित होते.

कापूसवाडगाव येथे महिलांना योजनांची माहिती देऊन महिला दिन साजरा

Displaying IMG-20220308-WA0158.jpg

वैजापूर गावासह परिसरातील महिलांना कृषी विभागांच्या विविध योजनांची माहिती देऊन तालुक्यातील कापूसवाडगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती महिलांना व्हावी या हेतूने महिला कृषि सहायकांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी उपसरपंच मंदा थोरात यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर कृषी सहायक उर्मिला जेजुरकर यांनी उपस्थितांना महाडीबीटी योजनेबद्दल माहिती दिली तर कृषि सहायक रुपाली देशमुख यांनी सांघिक खेळ घेऊन संदेश गळतीबाबत समजून सांगितले.

या कार्यक्रमात कृषी विभागाच्या पंढुरे, पालवे, मुळे, देहाडे, भंडारे, काजल बस्ते आदींनी हिरीरीने सहभाग घेतला. सुरुवातीला कापूसवाडगावच्या कृषी सहायक मीना पंडित यांनी सूत्रसंचालन करताना या कार्यक्रमाचे आयोजन आणि महिला दिन साजरा करण्याच्या उद्देशाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी सरपंच आशा धामणे, जिल्हा परिषद शिक्षिका किरण दळे, अंगणवाडी सेविका अश्विनी सोनवणे( बरकसे), भाग्यश्री पवार, अनिता त्रिभुवन, सारिका त्रिभुवन, अंगणवाडी मदतनीस शोभा गोरक्ष, लता थोरात, आशा कार्यकर्ती मनीषा निगळ, अलका खरमाळे, सुमन धामणे, रतन धामणे, निर्मला कुलकर्णी,  संगिता गायके, सुभद्रा गोरस यांच्यासह गावातील अन्य महिला तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुली उपस्थित होत्या.