ब्रेक दि बायस मंत्र जपला पाहिजे-कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर

नाशिक,८ मार्च / प्रतिनिधी :- स्त्री-पुरुष असा भेद न मानता समान दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, ब्रेक दि बायस हा नवा मंत्र जपला पाहिजे असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले.

Displaying DSC_0716.JPG

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘सुर तिचे निराळे’ कार्यक्रमात कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) अध्यक्षस्थानी होत्या.प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. दीपांजली लोमटे, सचिव श्रीमती शिल्पा पवार आदी उपस्थित होते.

Displaying DSC_0874.JPG

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, समाजात स्त्री-पुरूष समानता असणे गरजेचे आहे. जागतिक महिला दिनानिमित्त युनायटेड नेशन्स यावर्षाच्या थीम नुसार सर्वांनी कार्य करावे. स्त्री-पुरुष भेदभाव संपविण्यासाठी यापुढे विचार केला पाहिजे. त्यामुळे समाजातील महिलांना आर्थिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात प्राधान्य देणे गरजेचे आहे. रोजगार, शिक्षण आणि आर्थिक व्यवहारात स्त्रीला पुरुषांप्रमाणेच अधिकार दिले गेले पाहिजे. समाज संपूर्णपणे सक्षम आणि सशक्त करण्यासाठी महिलांनी आपले निर्णय स्वतः घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य क्षेत्राबरोबर अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, औषध, कला व उद्योग क्षेत्रात महिलांनी भरारी घ्यावी असे    त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, समाजाला पुढे नेण्यासाठी स्त्री शिक्षणाबरोबर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच महिलांनी मिळालेल्या यशाचे कौतुकही झाले पाहिजे. महिलांचे कर्तृत्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. महिलांनी आर्थिक, वैचारीकरित्या स्वावलंबी व्हावे जेणेकरुन त्या सक्षम होतील. महिला प्रत्येक कामात निपुण असतात. काळासोबत बदलून महिलांनी माघार न घेता परिस्थितीचा सामाना करावा असे त्यांनी सांगितले.

       विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणा-या व समाजातील सर्व महिला आणि मुलींच्या कार्याचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे. महिलांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. कुटुंबातील व्यक्तींनी महिलांच्या उपक्रमांना पाठींबा देणे गरजेचे आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सबल व्हाव्यात तसेच स्त्री-पुरुष समानता जोपासण्यात यावी यासाठी समाजाने प्रयत्न करावेत. समाजाच्या जडण-घडणीत महिलांचा वाटा महत्वपूर्ण आहे. विद्यापीठात कुलगुरु यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या ’ग्रीन  कॅम्पस’ उपकमात महिलांचा सहभाग उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

        विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोस्टर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्यात. यास्पर्धेमध्ये सहभागी अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचा मा. कुलगुरु यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. पोस्टर स्पर्धेत श्रीमती नुतन वाळके हिला प्रथम, श्रीमती रंजिता देशमुख यांना व्दितीय व श्रीमती प्रियंका बागुल हिला तृतीय क्रमांक मिळाला. पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील पाल्यांकरीता वकृत्व स्पर्धेत संमिधा संतोष कांचन सानप हिला प्रथम, श्रावणी प्रल्हाद सेलमोकर हिला व्दितीय तसेच आर्यन प्रमोद प्रणाली खिरोडे हिस तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच पाल्यांकरीता निबंध स्पर्धेत श्वेता काकड हिस प्रथम, ओम जितेंद्र पवार यांस व्दितीय व ऋतुजा सचिन जोशीला तृतीय क्रमांक मिळाला आहे. पोस्टर स्पर्धेतील पुरुष सहभागी डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. संदीप राठोड व श्री. जितेंद्र वाघ कुलगुरु यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Displaying DSC_0545.JPG

       विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिव, अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात मोठया प्रमाणात रोपांची लागवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक डॉ. दीपांजली लोमटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्रीमती शिल्पा पवार यांनी कले. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी उपस्थितांना महिला दिनानिमित्त देण्यात येणा-या शपथेचे वाचन केले.            

डॉ. प्रसाद बिवरे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या कर्तृत्ववान महिलांची मुलाखत घेतली. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), क्रीडा आहारतज्ज्ञ श्रीमती मयुरी देशमुख यांनी महिलांचे आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, महिला सक्षमीकरण व शिक्षण याबाबत आपले मत मांडले. गीतगायन कार्यक्रमात डॉ. मानसी शहाणे, डॉ. मनिषा देशमुख, श्री. चंद्रशेखर महामुनी यांनी बहारदार गीते सादर केली.   या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी अॅड. संदीप कुलकर्णी, डॉ. दीपांजली लोमटे, श्रीमती शोभना भिडे, श्रीमती शिल्पा पवार, श्री. प्रविण घाटेकर, श्री. सुरेश शिंदे, श्रीमती उज्वला पवार, श्रीमती रंजिता देशमुख,  श्रीमती शैलजा देसाई यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कोविड-19 संदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.