‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षेत बदल:२५ व २६ फेब्रुवारी रोजीचे पेपर पुढे

नांदेड,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सुरु असलेल्या परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. दि.२६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२१ ही परीक्षा असल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेत बदल करण्यात आलेला आहे. 

विद्यापीठाच्या दि. २५ व २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दोन दिवसाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही दिवसाचे पेपर त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्यानंतरच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी घेण्यात येतील. याबाबतचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविली आहे.