‘स्वारातीम’ विद्यापीठात संगीत वेबिनार २०२१ चे आयोजन

नांदेड ,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल, संगीत विभागाच्या वतीने दिनांक २४ सप्टेंबर रोजी ‘नाट्य संगीताचे महत्त्व’ या संगीत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेबिनारचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सदरील वेबिनार साठी विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.वेबिनारच्या पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध गायक ऑर्गन वादक ज्येष्ठ संगीतकार पं. गंगाधर विष्णुदेव, पुणे हे ‘भारतीय संगीतातील वाद्य प्रकार व हार्मोनियम वाद्याचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध अभिनेते संगीतकार गायक व्याख्याते पंडित चारुदत्त गोविंदस्वामी आफळे, पुणे हे ‘मराठी नाट्यसंगीताची वैभवशाली परंपरा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉक्टर विठ्ठल यांच्या संकल्पनेतून आणि प्रा रमाकांत जोशी यांच्यासह योजनातून हा वेबिनार होणार आहे. तरी या राष्ट्रीय वेबिनारमध्ये गायक, नाट्यकर्मी, कीर्तनकार, अभ्यासक, विद्यार्थी, कलावंत, संगीत साधकाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन डॉ पी विठ्ठल आणि संयोजक प्रा रमाकांत जोशी यांनी केले आहे.