गणोरी- गणेशपुर व बिल्डा या गावातील विकास कामांना निधी देणार

जिल्हा परीषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांचे ग्रामस्थांना आश्वासन

फुलंब्री,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील तीन नद्या वस्ती, गणेशपुर व तालुक्यातीस बिल्डा या गावास मंगळवार ( 22 फेब्रुवारी )  जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी भेट दिली व जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन विकास कामांना निधी देणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

तालुक्यातील गणोरी ते नायगाव या रस्त्याची व या रस्त्यावर दोन ठिकाणी पुल बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. नदीस मोठा पुर आल्यास या भागात असलेली खटकळी वस्ती व तीन नद्या वस्तीवरील नागरीकांना ये जा करण्यास मोठे अडचणीचे होते. गेल्या कित्येक वर्षापासुन हा रस्ता व्हावा अशी या वस्तीवरील नागरीकांची मागणी आहे. या रस्त्यावर सुमारे 72 कुटुंबे राहतात. त्यामुळे माजी उपसरपंच बाळासाहेब तांदळे, रावसाहेब तांदळे, नामदेव काळे यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती यांना हा रस्ता येऊन बघावा व येथील नागरीकांच्या समस्या जाणुन घ्या अशी विनंती केली होती.

Displaying IMG-20220222-WA0020.jpg

त्याअनुषंगाने मंगळवारी बांधकाम सभापती बलांडे यांनी या वस्तीवर येऊन रस्त्याची पाहणी केली व नागरीकांच्या समस्या जाणुन घेतल्या व जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन पुल किंवा रस्ता जे शक्य होईल ते काम करुन देण्याचे आश्वासन दिले व तात्काळ जिल्हा परीषदेच्या शाखा अभियंता यांना सुचना केल्या.तसेच गणेशपुर या वस्तीवर देखील भेट देत विकासकाम करण्याचे आश्वासन दिले. बिल्डा येथे ग्रामपंचायतीस भेट देऊन जनसुविधा योजनेअंतर्गत काम करण्याचे आश्वस्त केले.याप्रसंगी माजी उपसरपंच बाळासाहेब तांदळे, माजी उपसरपंच रावसाहेब तांदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव काळे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप भादवे, बाबासाहेब तांदळे, बाळु तांदळे, बंडु तांदळे, रायभान भादवे, कडुबा चंद्रे, भाऊसाहेब तांदळे, गणेश तांदळे, आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.