ग्लोबल परळीमार्फत शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट व गांडुळ कल्चरचे वाटप

फुलंब्री ,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे सोमवार शेतकऱ्यांना ग्लोबल विकास ट्रस्ट अंतर्गत ग्लोबल परळी कडून वर्मी कंपोस्ट बेड व तीन किलो गांडूळ कल्चरचे वाटप केले आहे यावेळी ग्लोबल परळी संस्थे मार्फत शेतकऱ्यांना गांडूळ कल्चर बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ग्लोबल परळी संस्थेचे अध्यक्ष जलनायक मयंक गांधी यांचा उद्देश हा आहे की शेतकऱ्याचे उत्पन्न एका वर्षात एक एकर मध्ये एक लाख झाले पाहिजे या धर्तीवर संस्थेचे काम चालू आहे ग्लोबल परळीने आता पर्यंत मराठवाडा विभागात शेतकऱ्यांना 1 कोटी पेक्षा जास्त फळझाडे वाटप केली असून शेकडो शेतकऱ्यांचे उत्पन्न लाखाच्या घरात पोहचले आहे त्याच जोडीने उत्पन्न तर वाढले पाहिजे पण शेती खर्च कमी झाला.

 शेतकऱ्याचे उत्पन्न एका वर्षात एका एकरात एक लाख रुपये निघाले पाहिजे हा आमच्या ग्लोबल परळी चा मुख्य उद्देश असून तो आम्ही प्रत्यक्षात उतरवला आहे शेतकऱ्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल त्यामुळे होईल तेवढं शेतकऱ्यासाठी पुढे काम करत राहु.-मयांक गांधी, अध्यक्ष, ग्लोबल विकास ट्रस्ट

या तत्वावर काम करून ग्लोबल परळीने शेतकऱ्यांना वर्मी बेड वाटप केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जो पाला पाचोळा आहे तो वाया जाणार नाही आणि शेतकऱ्याला शेतामध्ये उपयुक्त असं सेंद्रिय खत तयार होईल आणि शेतकऱ्यांना रासायनिक खतांची गरज जास्त भासणार नाही ग्लोबल परळी अंतर्गत शेतकऱ्यांना वर्मी बेड वाटप केले या वेळी ग्लोबल परळीचे समन्वयक योगेश तुपे  पाणी फाऊंडेशनचे समन्वयक प्रल्हाद आरसुळ, सरपंच शिवाजी कोंडके व ग्रामस्थ उपस्थित होते.