गुणवत्तापूर्ण आणि नियोजित वेळेत रस्त्यांची सुविधा उपलब्ध करुन देणार – नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद शहरातील रस्त्यासाठी चार कोटी 20 लाख रुपयाच्या निधीची मान्यता

विजयनगर चौक ते गजानन नगर, सिंधी कॉलनी,संत एकनाथ रंगमंदिर ते शहा कॉलनी रस्त्याचा समावेश  

औरंगाबाद,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद शहरातील विविध रस्त्यांची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करुन शहरवासियांना पायाभूत सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे प्रतिपादन नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी केले.

Displaying 2.jpeg

यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे, नांदेडचे  खासदार हेमंत पाटील माजी खासदार चद्रकांत खैरे,आमदार अंबादास दानवे, संजय सिरसाट, रमेश बोरणारे, उदयसिंह राजपूत, यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद शहरातील बाळकृष्ण नगर ते शिवनेरी कॉलनी, विजयनगर चौक ते गजानन नगर, सिंधी कॉलनी तसेच संत एकनाथ रंगमंदीर ते शहा कॉलनी या तीन ठिकाणाच्या रस्त्याच्या सिमेंट क्रॉन्क्रेटी करण कामाच्या भूमीपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये विजयनगर चौक ते गजानन नगर रस्ता यासाठी एक कोटी, सिंधी कॉलनीस दोन कोटी व शहा कॉलनीच्या रस्त्यासाठी एक कोटी 20 लाख रूपयाचा निधी रस्त्यासाठी मंजूर करण्यात येत असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.

शहरात चांगल्या प्रकारचे रस्ते, दळणवळण सुविधा उपलब्ध असतील तर शहराचा विकास तुलनेने वेगाने होतो. रस्ते निर्मीतीसाठी रस्ते विकास महामंडळ, नगर विकास विभाग व इतर विभागाचा निधी उपयोगात आणला जात आहे. यातून विकास साध्य होत आहे. लोकप्रतिनिधींनी विकास कामाच्या पाठपुराव्या बरोबरच निधीचा योग्य वापर करुन जनतेलासुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम करावे. औरंगाबाद शहरातील रस्त्यासाठी 152 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून याच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध रस्ते कामांना गती येणार असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

Displaying 6.jpeg

रस्ते विकासाबरोबरच समृद्धी महामार्ग, वाळूज, शेंद्रा- बिडकीन व डीएमआयसीच्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्हयाची औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. विकासाबरोबरच तो  पर्यावरण पूरक व्हावा यासाठी सफारी पार्क, बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.