नया है वह ! फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना मृतांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, ही बाब योग्य नाही, भाजपवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना नया है वह, असा टोला लगावला.

भाजपवर टीका करणाऱ्या मंत्री आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांनी चांगलाच समचार घेतला. नया है वह, असे म्हणत त्यांनी आदित्य यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांना हवे त्या व्यक्तीला मंत्री करता येते परंतू मंत्री झाला म्हणून शहाणं होता येते, अशी बाब नाही, असे म्हणत आदित्य यांच्यावर त्यांनी टीका केली. फडणवीस हे डिझास्टर टुरीझम करत आहेत, अशी टीका यापूर्वी आदित्य यांनी केली होती.

फडणवीस म्हणाले, “राज्य सरकार कोरोना रुग्णांची आकडेवारी देण्यात घोळ करत आहेत. अद्यापही कोरोना मृतांपैकी घरी मृत पावलेल्या सहाशे जणांची आकडेवारी रेकॉर्डवर घेतलेली नाही. अनेक कोरोना मृतांची दखल सरकारने घेतलेली नाही. १० जुलै रोजी कोरोनामुळे मृत् झालेल्या २८७ जणांना अन्य कारणाने मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना मृतांच्या आकड्यांची लपवालपवी करूनही हा दहा हजारांच्या पार गेला ही बाब चिंतेची आहे.”, असेही ते म्हणाले. 

मुंबईत आजही दररोज केवळ पाच हजारांपर्यंतच कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. कोरोनाचे मृत्यू दाखवले ते वेगळे आहेत. पण अन्य मृत्यू कोरोनामुळेच होत आहेत. राज्याचे सरकार अशाप्रकारे जर कोरोना मृत्यू लपवत असेल तर राज्याला मोठ्या संकटात आपण ढकलत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *