एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची धोरणात्मक निर्गुंतवणूक प्रक्रिया 27 जानेवारी 2022 रोजी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत किसनराव कराड यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तराद्वारे ही माहीती दिली.

समभागांच्या निर्गुंतवणुकीची टक्केवारी किती होती, या प्रश्नावर उत्तर देतांना कराड म्हणाले की एअर इंडियाच्या 100 टक्के समभागांची (ज्यात100 टक्के उपकंपनी, एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड (AIXL) आणि  50 % समभाग, जेव्ही, AISATS चाही समावेश आहे.) निर्गुंतवणूक झाली आहे, असे त्यांनी सांगितले.  

एअर इंडियाची 27 जानेवारी 2022 ला झालेली निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आता केंद्र सरकारकडे एअर इंडिया किंवा AIXL चे कोणतेही समभाग स्टेक्स उरलेले  नाहीत आणि आता एअर इंडियाच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी, त्यांच्या खरेदीदाराकडे आहे, असेही त्यांनी सांगितले.