औरंगाबाद जिल्ह्यात 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 338 जणांना (मनपा 190, ग्रामीण 148) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 61 हजार 336 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 559 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 714 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 509 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (72)

पुडंलिक नगर 1, नरहरी नगर 1, जय भवाणी नगर 3, उस्मानपुरा 1, प्रताप नगर 1, उल्कानगरी 1, संत तुकोबा नगर 1, पैठण गेट 1, भगतसिंग नगर 1, मयुर पार्क 1, होनाजी नगर 1, अन्य 59

ग्रामीण (12)

औरंगाबाद 4,  गंगापूर 3, सिल्लोड 2,  वैजापूर 3,

मृत्यू  (05)

घाटी (02)

1.     72 पुरुष, ता.कन्नड, औरंगबाद

2.    41 पुरुष, दहेगाव ता.गंगापुर, औरंगाबाद

खासगी (03)

1.     73 पुरुष, एस.बी.कॉलनी , औरंगाबाद

2.    89 पुरुष, दशमेश नगर, औरंगाबाद

3.    86 पुरुष, इटखेडा, औरंगाबाद