महानगरपालिका, जि.प व पं.स निवडणूका लवकरच ! – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

गावागावात, वॉर्डावॉर्डात संघटनात्मक बांधणी मजबूत करा 

औरंगाबाद,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामांची दखल राष्ट्रीय स्तरावर झाली आहे. अनेक सर्वेक्षणात ते टॉप फाईव्ह मध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या कामांची माहिती त्यामुळे आता शिवसैनिकांनी गावागावात, वॉर्डावॉर्डात संघटनात्मक बांधणी मजबूत करा. महानगरपालिका, जि.प व पं.स निवडणूका लवकरच होण्याची शक्यता शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांनी व्यक्त केली.

Displaying IMG-20220207-WA0080.jpg

हॉटेल यशोदीप येथे झालेल्या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रमुख पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.यावेळी बैठकीस जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडे, राजेंद्र राठोड, बाबासाहेब जगताप, भाऊ सांगळे, संतोष काळवणे, किशोर अग्रवाल, विनोद बोंबले, बप्पा दळवी, अशोक शिंदे, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, सचिन वाणी, दिनेश मुथा, राजु वरकड, सुभाष कानडे विधानसभा संघटक राजेंद्र वैद्य, गोपाल कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी,उपशहर प्रमुख सचिन वाघ आदी उपस्थित होते.