भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 115.23 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

  • गेल्या 24 तासात 72.94 लाख मात्रांचे लसीकरण
  • रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.28%
  • गेल्या 24 तासात 11,106 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  • उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,26,620
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.92%) गेले 56 दिवस 2% पेक्षा कमी

नवी दिल्ली ,१९ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- गेल्या 24 तासात 72,94,864 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 115.23 (1,15,23,49,358) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 1,18,39,293 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 12,789 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,38,97,921 झाली आहे.परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.28% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 145 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.गेल्या 24 तासात 11,106 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,26,620 आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.37% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,38,699 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 62.93 (62,93,87,540) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.


देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.92% असून गेल्या 56 दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.98% असून गेले 46 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 81 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,38,699 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 62.93 (62,93,87,540) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

कोविड – 19 अद्ययावत माहिती

  • राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 115.23 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
  • रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.28 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात अधिक
  • गेल्या 24 तासात बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 12,789 पर्यंत वाढल्याने कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,38,97,921
  • गेल्या 24 तासामध्ये 11,106 नव्या रूग्णांची नोंद
  • भारतातील सक्रिय रूग्णसंख्या 1,26,620
  • सक्रिय रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.37 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात कमी

  • दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी दर (0.98%) इतका असून गेल्या 46 दिवसांपासून हा दर 2 टक्के पेक्षा कमी
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.92%) इतका आहे, गेल्या 56 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी
  • आत्तापर्यंत एकूण 62.93 कोटी चाचण्या करण्यात आल्या.