प्राप्तिकर विभागाच्या नव्या ई-फायलिंग पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 6.17 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे

नवी दिल्ली ,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-प्राप्तिकर विभागाच्या नव्या ई-फायलिंग पोर्टलवर 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत सुमारे 6.17 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली तसेच सुमारे 19 लाख प्रमुख कर लेखा अहवाल देखील भरण्यात आले. 

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 6.17 कोटी आयटीआर भरण्यात आले, यापैकी 48 % आयटीआर-1 (2.97 कोटी), 9 % आयटीआर-2 (56 लाख) 13% आयटीआर-3 (81.6 लाख), 27% आयटीआर-4 (1.65 कोटी), आयटीआर-5 (10.9 लाख), आयटीआर-6 (4.84 लाख) आणि आयटीआर-7 (1.32 लाख).

आर्थिक वर्ष 21-22 मध्ये 1.73 लाखांपेक्षा जास्त 3CA-3CD फॉर्म आणि 15.62 लाख 3CB-3CD फॉर्म भरण्यात आले आहेत. या वर्षी 06.02.22 पर्यंत 1.61 लाखापेक्षा जास्त इतर कर लेखापरीक्षण अहवाल (फॉर्म 10B, 29B, 29C, 3CEB, 10CCB, 10BB) दाखल करण्यात आले आहेत.

विभागाने करदात्यांना आणि सनदी लेखापालांना ई-मेल, एसएमएस आणि ट्विटर द्वारे आपले कर मूल्यांकन अहवाल/आयकर विवरण पत्र, शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता, वेळ न दवडता सादर करण्याचे स्मरणपत्र पाठवले आहे. तसेच कर विवरण पत्र भरताना करदात्यांना काही अडचणी आल्यास त्यांच्या निराकरणात मदत कारण्यास दोन नवे ई-मेल आयडी- [email protected] आणि [email protected] तयार करण्यात आले आहेत. ज्या करदात्यांनी/कर व्यावसायिकांनी मूल्यांकन वर्ष 2021-22 करीत आपले कर मूल्यांकन अहवाल किंवा आयकर अहवाल सादर केले नसतील त्यांना विनंती आहे की, शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी, आपले कर मूल्यांकन अहवाल त्वरित सादर करावे.