शाहीर गुलाबराव नळणीकर यांचा सत्कार

जालना ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-जालना जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गांधी चमन जुना जालना येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्या नंतर जालना जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष जेष्ठ शाहीर गुलाबराव नळणीकर आणि त्यांच्या कलावंत सहकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या आवडीची भजने गाऊन कार्यकर्त्यांना मंत्रमुग्ध केले. याच कार्यक्रमात जेष्ठ लोककलावंत शाहीर गुलाबराव नळणीकर यांना मानाचा राज्यस्तरीय थोर कवी वामनदादा कर्डक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भारतीय कांग्रेस सरचिटणीस भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याणराव दळे, कार्येध्यक्ष राजेंद्र राख, शहर अध्यक्ष शेख महेमुद, शहर उपाध्यक्ष फकिरा वाघ यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येऊन सत्कार करण्यात आला.