जालना जिल्हा स्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत विक्की बालाजी राजपूत सर्वप्रथम

जालना ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-जालना जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन संचलित, व्हील पॉवर फिटनेस सेंटर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन अंतर्गत  शहरातील नविन मोंढा येथे जालना श्री-2022चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जालना जिल्हाध्यक्ष मनीष नंद, जालना जिल्हा सचिव सतिष सिल्लेवार, जिल्हा उपाध्यक्ष चेतन जटावाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. बॉडी बिल्डिंग जिल्हा स्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 2022“ मध्ये विक्की बालाजी राजपूत (काबरे) यांनी सर्वप्रथम क्रमांक मिळवून जालना श्रीचा मानाचा किताब मिळविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.