बापू घडामोडे यांची भाजप ओबीसी  प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

औरंगाबाद ​:-दि.24​ ऑगस्ट ​भारतीय जनता पार्टीचे  शहराचे माजी महापौर  बापू घडामोडे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती,​करण्यात आली आहे . ​

ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर व भाजप प्रदेश अध्यक्ष्य चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपचे संभाजीनगर चे ज्येष्ठ नेते श्री भगवान( बापू) घडामोडे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे,बापू घडामोडे यांनी अनेक संघटनांनी जबाबदाऱ्या पार पडल्या,भारतीय जनता पार्टी  वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले, तसेच तळागाळातील वंचित, उपेक्षित,घटकाला बापू घडामोडे यांनी भारतीय जनता पार्टीशी जोडले, त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने , बापू घडामोडे यांना प्रदेश सरचिटणीस पदी निवड करून नविन जबाबदारी दिली व पूर्ण महाराष्ट्र मध्ये ओबीसी समाजामध्ये कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या या नियुक्तीबद्दल खा. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील,पंकजाताई मुंडे,विरोधी पक्ष नेते​ ​देवेद्र फडण​वि​स,प्रविण दरेकर, महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर,राज्यसभा खा.डॉ. भागवत कराड, विधानसभा माजी अध्यक्ष  हरिभाऊ बागडे, शहराध्यक्ष संजय केनेकर,आ.अतुल सावे​,​ शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, संघटनमंत्री भाऊराव देशमुख इत्यादी मान्यवरांनी बापू घडामोडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, व भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे  अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *