जालना शहरातील रस्त्यांची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याची आ. कैलास गोरंटयाल यांची ग्वाही

जालना ,२९ जानेवारी /प्रतिनिधी :- जालना शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापाठोपाठ बहुतांशी प्रमुख रस्ते,अंतर्गत रस्त्यांची कामे देखील मार्गी लागली आहेत.५० कोटी रुपयांचा निधी खर्चून उर्वरीत रस्त्यांची कामे येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही आ. कैलास गोरंटयाल यांनी आज येथे बोलताना दिली.         

राज्य सरकारने वैशिष्ट पूर्ण योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या शोला चौक ते रामदेव बाबा मंदिर, स्व. भगवंतराव गाढे चौक ते लक्की ज्यूस सेंटर व्हाया दीपक हॉस्पिटल या सिमेंट रस्त्याच्या व प्रीती सुधा नगर भागात भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ आज शनिवारी आ. कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शोला चौकात रुपचंद उस्ताद व्यायामशाळा  आणि तेली चौकाचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

Displaying DSC_0040 copy.JPG

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा संगीताताई गोरंटयाल,युवा नेते अक्षय गोरंटयाल,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव जेठे, संजय मंत्री,नंदुकाका खर्डेकर,कुंदन बागडी, जिवन पिपरीये, दिनेश लाचुरिये, सतीश लाचुरिये, संदीप चौडिये, अमोल धानुरे, बालाजी एलगुंदे, सुखलाल राजपूत,नितीन जगताप,उमेश गवारे, ज्ञानेश्र्वर क्षीरसागर, कैलास आवळे,सतीश गोंटे, राधे कदम, अमोल क्षीरसागर,सचिन लिधोरये,पंकज सुरा,उमेश देशमाने,गणेश क्षीरसागर, शुभम हिवाळे,गणेश वैद्य, राहुल बिकनेर, महेश कोळेश्र्वर आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. गोरंटयाल म्हणाले की, शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यामूळे रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न जालना नगर परिषदेच्या माध्यमातुन करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून ही कामे करतांना प्रत्येक प्रभागाला प्राधान्य दिले आहे. शहरातील काही प्रमूख आणि अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून लवकरच 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून सदर निधी प्राप्त होताच मार्चअखेरपर्यंत उर्वरित रस्त्यांची कामे पूर्ण केली जाईल आ. कैलास गोरंटयाल यांनी दिली.         

आ. गोरंट्याल म्हणाले की, जालना शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात आला असला तरी शहरवासीयांना आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा आपला मानस असून त्यासाठी जालना शहरात उभारण्यात आलेल्या 11 जलकुंभांची कामे पूर्ण झाली असून 425 किलोमीटर जलवाहिनीचे काम देखील अंतिम टप्प्यात आलेले आहे. या कामाची टेस्टिंग घेतल्यानंतर लवकरच शहरवासीयांना आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन आ. गोरंट्याल यांनी दिले.

नगरसेविका अनिता वाघमारे व विष्णू वाघमारे यांनी मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रभागात केलेल्या विकास कामांचे कौतुक करून आगामी काळात देखील जालना नगरपालिकेत विकास कामांशी बांधील असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आ. गोरंट्याल यांनी शेवटी केले.

तत्पूर्वी किसनराव जेठे यांनी आमदार कैलास गोरंट्याल व माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल यांनी मागील पाच वर्षात शहरात केलेल्या विकासकामांचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष महेश सारस्वत, नगरसेवक रमेश गौरक्षक, जगदीश भरतीया, ऍड राहुल हिवराळे, विनोद यादव, शेख वसीम, रविंद्र फुलभाटी, हरीश देवावाले, अप्सर चौधरी,तसेच जुना जालना भागात दीपक हॉस्पिटल जवळ झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, डॉ. संजय राख, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेन्द्र राख, सय्यद रहीम तांबोळी,, मुस्तकिन हमदुले,नगरसेवक वाजेद खान, आमेर पाशा,शेख शकील, विजय पवार, नजीब लोहार, सुभाष पवार, किशोर गरदास,सय्यद अजहर, गणेश चौधरी, शहर अभियंता सय्यद सऊद, कनिष्ठ अभियंता किरण काळे,अनिल भद्रे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.