वैजापूर शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वैजापूर ,२६ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर  शहरातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन रोजी कोरोनाचे नियम पाळत झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हा परिषदप्रशाला (मुलांची) येथे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या हस्ते ध्वज झाला.

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, प्रभारी तहसीलदार महेंद्र गिरगे, रामेश्वर महाजन, श्री. कनवनकर, पोलीसनिरीक्षक सम्राटसिंह राजपूत,पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, सैनिक दलाचे सेवानिवृत्त कमांडरगौतम गायकवाड, एम.आर.गणवीर, दिलीप त्रिभुवन, रवींद्रआप्पा साखरे, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती.

Displaying IMG-20220126-WA0170.jpg

तसेच नगरपालिकेत नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार महेंद्र गिरगे,पोलीस स्टेशन येथे,पोलिसनिरीक्षक सम्राटसिंह राजपूत,पंचायत समितीत सभापती सीनाताई मनाजी मिसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, हुतात्मा स्मारकात वसंत रामचंद्र कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती भागीनाथ मगर,,मर्चंटबँकेत बाळासाहेब संचेती, विशाल संचेती यांनी तर विविध संस्था व शाळा महाविद्यालयात कार्यालय प्रमुख यांनी ध्वजारोहण  करून गणतंत्र दिन साजरा केला.

Displaying IMG-20220126-WA0175.jpg

संकट मोचन मंदिर समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भारत मातेचे पूजन ठेवले होते तेथे गौरव दौडे, धुमाळ, स्वप्नील राजपूत, धोंडीराम राजपूत, मकरंद कुलकर्णी यांनी पूजन केले. लक्ष्मी टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही भारत माता पूजन करण्यात आले. याप्रसंगी मा.नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ, दिनेश  परदेशी,नगरसेवक डॉ.निलेश भाटिया,उल्हास ठोंबरे,गटविकास अधिकारी कैलास जाधव, मुख्याधिकारी भागवत बिघोत,इम्रान कुरेशी, डॉ, व्ही.जी.शिंदे, मेजर सुभाष संचेती, महेंद्र काटकर, पारस पेटारे, नगरसेविका माधुरी बनकर, डॉ.प्रिती भोपळे आदी उपस्थित होते.