संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू ; 122 विदयार्थ्यांची नामांकित कंपनीत अभियंता म्हणून निवड

कॅम्पस इंटरव्यूह: विद्यार्थ्यांना मिळाली रोजगारांची संधी

वैजापूर,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी निर्माण करुन देण्यात आघाडीची भुमिका घेतल्याचे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी केले. संजीवनीचे 122 विद्यार्थ्यांची  टाटा कन्सलटनसी सर्विसेस (टीसीएस) आणि इन्फोसिस साॅफ्टवेअर बहुराष्ट्रीय कंपनीत आकर्षक वेतन पॅकेज साठी निवड झाली.

या विद्यार्थी  आणि पालकांचे अभिनंदन करुन त्यांना मार्गदर्शन करताना मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संजीवनी शैक्षणिक संकुलाचे पाठबळामुळे देशभरात विविध नामांकित कंपन्यांत बहुतांशी ग्रामिण भागातील विद्यार्थ्याचा निवड होण्याचा ओघ अधिक आहे. दोन वर्षांत कोविड संसर्गामुळे सर्व क्षेत्रातील अर्थकारण कोलमडले पडले होते.ग्रामीण भागाला यांचा मोठा फटका बसला. अशा स्थितीत संजीवनीने अभियांत्रिकी महाविद्यालयाने ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी लक्ष केंद्रीत केल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी करण्याची संधी प्राप्त झाल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

इन्फोसिस कंपनीने निवड केलेले विद्यार्थ्यांत 2021-22 अंतिम वर्षाचे  काॅम्युटर इंजिनिअरींग विभाग 14, इन्फर्मेशन टेक्नालाॅजी विभाग 6 ,मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग 13, इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग 4, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग 9 व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग 14 नवोदित अभियंत्यांचा समावेश आहे.