पोलिस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) औरंगाबाद कार्यालयामार्फत इनडोअर फायरिंग रेंज व बॉक्सींग विंगचे उद्घाटन

औरंगाबाद,२६ जानेवारी / प्रतिनिधी :-  पोलिस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) औरंगाबाद कार्यालयामार्फत नव्याने तयार करण्यात आलेल्या बॉक्सींग विंग व फायरिंग रेंज चे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.

Displaying _DSC5796.JPG

               पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या (ग्रामीण) आवारात उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अंबादास दानवे,  विशेष पोलिस महानिरिक्षक मल्लीकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण,जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक पवन बनसोड, बॉक्सींग आणि फायरिंग रेंज असोशिएशनचे पदाधिकार तसेच पोलिस अधिकारी, अमंलदार उपस्थित होते. यावेळी गडचिरोली येथे खडतर सेवा प्रदान केलेले पोलीस अधिकारी प्रदिप आवटे यांचा  श्री. देसाई यांच्या हस्ते पदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Displaying _DSC5787.JPG

               श्री. देसाई म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामात कौशल्य प्राप्त करुन ते  जतन केले पाहिजे. त्यामुळे आपल्या कामास गती मिळते. पोलिस विभागाला अधिक गतीमान करण्याचे शासनाचे ध्येय असून विभागासाठी वाहन, हत्यारे आदीमध्ये सुसज्ज असण्याबरोबर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी निधीची वेळोवेळी उपलब्धता करण्यात येत आहे.

Displaying _DSC5803.JPG

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या या बॉक्सींग विंग व फायरिंग रेंजच्या माध्यमातून पोलीसांना आपल्या कौशल्यात अद्यायावत राहण्यास मोठी मदत होणार आहे. या सुविधेचा पोलिस दलासोबत नागरिकांनाही वापर करण्याची संधी मिळाल्यास या क्षेत्रात उत्तम खेळाडू तयार होतील त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची सुचनाही श्री. देसाई यांनी संबंधितांना केली.