फेसबुक अकाऊंट हॅक करून हप्त्याची वसूली,उपनिरीक्षकांची सायबर पोलिसांकडे तक्रार
जालना ,२० जानेवारी /प्रतिनिधी :- जालना शहरातील सदर बाजार पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रमेश भुतेकर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून हप्त्याची वसूली सुरू असल्याचा अतिशय गंभीर प्रकार समोर आला असून या सगळ्या प्रकरणात आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही असे रूपेकर यांनी म्हटले आहे.
जालना शहरातील सदर बाजार पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक रूपेकर यांच्या फेसबुक पेज हॅक करून त्यावरून पैशाची मागणी होत होती ही बाब शहरात मोठय़ा चर्चेचा विषय झाला अनेक लोकांनी रूपेकर यांच्या हा प्रकार घडला तो लक्षात आणून दिला पैसे मागणी करणारे चॅटचे स्क्रीन शाॅट व्हायरल झाले त्यानंतर रूपेकर यांनी खुलासा करून या बाबतीत सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. बिहार राज्यातील एका गावातील जैन नावाचा एका व्यक्तीने हा उद्योग केल्याचे समजते अशी माहिती रूपेकर यांनी दिली आहे संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.