उज्ज्वला योजनेला देखील सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, 7.4 कोटी महिलांना मिळणार फायदा: अमित शहा

नवी दिल्ली:

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, कोरोना आपत्तीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये याची काळजी घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाची गौरवपूर्ण स्तुती केली आहे.

ट्वीटमध्ये अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत कोट्यावधी गरिबांना शिधा पुरवणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएमजीकेवाय) नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 

अमित शाह म्हणाले, “कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या काळात पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब महिलांना तीन महिन्यांसाठी तीन मोफत सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला होता. अनेक कुटुंबांना तीन सिलिंडर्स उपलब्ध होऊ शकले नाहीत म्हणून परिणामी ही योजना सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.”

 “7 कोटी 40 लाख महिलांना याचा फायदा होईल,” असे अमित शहा म्हणाले.

“आज, मंत्रिमंडळाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी स्थलांतरितांसाठी “परवडणाऱ्या दारात भाड्याने गृहनिर्माण संकुलाला” मान्यता दिली. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शहरांमध्ये बांधलेले पीएमएवाय फ्लॅट्स स्थलांतरित मजुरांना स्वस्त भाड्याने मिळू शकतील, असे अमित शहा म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे आभार मानले; यामुळे “सर्वांसाठी घर” हे उद्दिष्ट अधिक दृढ होईल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “सबका साथ, सबका विश्वास” या मंत्राबद्दलच्या आपल्या प्रतिबद्धतेवर पुन्हा जोर देत पंतप्रधानांनी छोट्या व्यवसायांना लाभदायक ठरणाऱ्या आणखी एका महत्त्वाच्या योजनेला मुदतवाढ दिली आहे”. “आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईपीएफ खात्यातील योगदान ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे लघु उद्योगातील सुमारे 72 लाख लोकांना फायदा होईल”, असे अमित शहा म्हणाले.

अमित शहा म्हणाले की, 1,00,000 कोटी रुपयांच्या ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमुळे कृषी क्षेत्र बळकट होईल. यातून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधानांची वचनबद्धता प्रतिबिंबित होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती प्राप्त होईल,असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.