बरे झालेल्या बाधितांची संख्या 50 लाखांच्या घरात

नवी दिल्ली,  27 सप्टेंबर  2020
गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या लागोपाठ दुसर्‍या दिवशी जास्त होती. या काळात 92 हजारांवर बाधित बरे झाले, तर 88 हजारांवर नवे संक्रमित आढळून आले.

92,043 बाधित गेल्या 24 तासांत बरे झाल्यामुळे देशात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 49,41,628 झाली आहे. सक्रिय बाधितांच्या संख्येत 4,567 ने घट होत ती 9,56,402 झाली.88,600 नव्या बाधितांमुळे देशातील संक्रमितांची संख्या 59,92,533 झाली आहे. याच काळात 1124 जणांचा मृत्यू झाल्यामुळे प्राण गमावलेल्या एकूण बाधितांची संख्या 94,503 वर पोहोचली. देशातील बरे झालेल्यांची टक्केवारी 82.46 झाली आहे. सक्रिय बाधितांचे प्रमाण 15.96 टक्के, तर मृत्यूचे प्रमाण 1.58 झाले आहे.
जगातील कोरोना संक्रमितांची संख्या 3,28,40,145 वर गेली असून, आतापर्यंत 9,94,146 लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील संक्रमितांची संख्या 70,77,000 च्या वर गेली असून, 1,04,000 जणांचा आतापयर्र्त मृत्यू झाला आहे. संक्रमितांच्या संख्येत भारत जगात दुसर्‍या स्थानावर आहे. तिसर्‍या स्थानावरील ब्राझीलमधील संक्रमितांची संख्या 47,18,000 हजार असून, तेथील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,41,000 वर गेली आहे.

रशियातील संक्रमितांची संख्या 11,39,000 असून, 20,140 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, संक्रमितांच्या आणि मृत्युच्या संख्येत महाराष्ट्राने रशियावर मात केली. महाराष्ट्रातील संक्रमितांची संख्या 13,21,176 तर कोरोनाबळींची संख्या 35,191 आहे.

भारतात नवीन रूग्णसंख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या अधिक

भारतात  सतत गेल्या नऊ दिवसांपासून नविन रूग्णसंख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या  वाढत आहे.बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत उच्चांकी  वाढ होत आहे.एका दिवसात बरे झालेल्या रूग्णांची सरासरी  संख्या 90,000 पेक्षा जास्त आहे.

देशात गेल्या 24 तासात 92,043  रुग्ण बरे झाल्याची  नोंद झाली आहे तर नव्या सक्रीय रूग्णांची संख्या 88,600 इतकी आहे. यासोबत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 50 लाख (49,41,627) इतकी आहे. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सततची वाढ कायम राखत  82.46% इतका आहे.

ह्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामुळे भारत रुग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीत सतत उच्च स्थानावर आहे.नवीन रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचा दर जास्त असल्याने बरे झालेले रूग्ण आणि नवीन सक्रीय रूग्ण यातील फरक सतत वाढत आहे. सक्रिय रूग्ण आणि बरे झालेले रूग्ण यातील फरक जवळपास 40 लाख (39,85,225) इतका आहे.सक्रीय रूग्णांची संख्या सतत कित्येक दिवसांपासून 10 लाखांपेक्षा कमी आहे. सक्रीय  पॉझिटीव्ह रूग्णांचे प्रमाण  15.96%इतके असून ते सतत कमी होत आहे.

केंद्रात आणि राज्यसरकार/केंद्रशासित प्रदेशात सक्रीय,आणि परीणामकारक समन्वय साधल्यामुळे एका दिवसात बरे होण्याच्या रुग्णांत सतत वाढ राखणे शक्य झाले आहे.21 राज्ये /केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे.हा परिणाम केंद्र सरकारच्या सतत सुरु असलेल्या गुणवत्तापूर्ण आणि परीणामकारक उपाययोजना आणि त्यांचे सतत पुनरावलोकन करणे यामुळे गाठणे शक्य झाले आहे.लवकरात लवकर रुग्णाची ओळख पटवून देशभरात चाचण्या, काळजीपूर्वक सावधानता आणि त्यासोबत प्रमाणित वैद्यकीय मदत यामुळे अशा प्रकारचे उत्साहवर्धक यश मिळाले आहे.

बरे झालेल्या रुग्णांपैकी 76 टक्के रुग्ण दहा राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये

गेले काही दिवस सलगपणे भारतात नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे गेल्या चोवीस तासात 92,043 रुग्ण बरे झाले यातील 76 टक्के रुग्ण दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बरे झाले. महाराष्ट्राने  सर्वोच्च स्थान कायम राखले आहे. महाराष्ट्रातून 23,000 जण बरे झाले तर आंध्रप्रदेश मधून 9,000  पेक्षा जास्त जण बरे झाले. गेल्या 24 तासात 88,600 नवीन रुग्ण नोंद झाले आहेत यापैकी 77 टक्के रुग्ण 10 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.

यामध्ये देखील महाराष्ट्राने अग्रस्थान राखले आहे तिथून 20,000 रुग्णांची नोंद झाली आहे तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून अनुक्रमे 8000 आणि 7000 रुग्णांची नोंद झाली आहे.गेल्या चोवीस तासात 1124 मृत्यूची नोंद झाली आहे यांपैकी 84 टक्के रुग्ण दहा राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत नवीन नोंद झालेल्या  मृत्यूपैकी महाराष्ट्राने 430 मृत्यूसह 38 टक्के मृत्यू नोंदवले आहे तर कर्नाटक आणि तमिळनाडू यांनी अनुक्रमे 86 आणि 85 मृत्यूंची नोंद केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *