केरळमध्ये भीषण विमान अपघात ,वैमानिकासह १७ जणांचा  मृत्यू

Image

कोझिकोड (केरळ),
वंदे भारत अभियानांतर्गत दुबईहून आलेले एअर इंडियाचे(Air India Express flight IX 1344) विमान मुसळधार पावसात धावपट्टीवर उतरत असताना, घसरून दरीत पडल्याने विमानाचे दोन तुकडे झाले.  या अपघातात वैमानिकासह १७ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य 40 जण जखमी झाले. ही दुर्घटना केरळमधील कोझिकोड विमानळावर शुक्रवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घडली.

Image

वंदे भारत मोहिमेंतर्गत सेवा देत असलेले एअर इंडियाचे आयएक्स-1344 हे विमान दुबईहून कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर उतरत होते. यावेळी विमानात 195 प्रवासी व कर्मचारी होते. सायंकाळी 7.40 वाजता मुसळधार पाऊस सुरू असताना धावपट्टीला स्पर्श करताच विमान घसरले आणि 30 फूट खोल दरीत पडले. यावेळी धावपट्टी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते, यामुळे वैमानिकाला अंदाज आला नसल्याचे सूत्रांचे मत आहे.

Image

केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायूदलात विंग कमांडर असलेले कॅप्टन दीपक साठे यांनी १९८१ ते २००३ या कालावधीमध्ये देशसेवा केली. वायूदलातून निवृत्त झाल्यानंतर दीपक साठे २००३ साली एयर इंडियामध्ये रुजू झाले. दीपक साठे हे मुंबईच्या पवईतील जलवायू विहार येथे राहत होते. 

Image

कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एयर इंडियाचं A737 बोईंग हे विमान रनवेवर घसरलं आणि दरीमध्ये गेलं. 

या अपघातात वैमानिक दीपक वसंत साठे यांच्यासह १७ जणांचा मृत्यू झाला. प्रवाशांपैकी 40 जण जखमी झाले. तसेच, सहवैमानिकही गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वतीने देण्यात आली.

Image


 
या अपघातात विमानाचे कॉकपिट आणि त्याचे दार पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले आहे. अपघातानंतर आग न लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांमध्ये 10 बालकांचाही समावेश आहे. बहुतांश प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफसह अन्य बचावपथके घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली असून, मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *