छत्रपती शाहू पॉलिटेक्निकमध्ये २२० विद्यार्थ्यांना कोविड लस

औरंगाबाद,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य विभागातर्फे १५ ते १८ वयोगटातील  मुला – मुलींसाठी कोरोना लसीकरण  मोहीम राबविण्यात आली.  १५ वर्ष वयोगट व त्यावरील सर्व मुलांना लस देण्याचे शासनाने जाहीर केले असून शाळा व महाविद्यालयातील सर्व मुलांचे १००% लसीकरण करण्याचे उद्दीष्ट  समोर ठेवले आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकमध्ये मेगा व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह म्हणजेच भव्य लसीकरण मेळावा  तंत्र शिक्षण संचालनालय, महानगरपालिका औरंगाबाद आणि इनरव्हील क्लब औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केला असून यामध्ये आज २२०  विद्यार्थ्यांना लस देण्यात आली  व आजपर्यंत ८०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लब औरंगाबादच्या अध्यक्षा लता मुळे, डॉ . उमेश नागदेवे (सहसंचालक तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालय), डॉ. पारस मंडलेचा (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका औरंगाबाद) यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. अर्चना गादिया (आरोग्य अधिकारी  प्राथमिक आरोग्य केंद्र , नक्षत्रवाडी), इनरव्हील क्लबच्या सचिव  छाया भोयर, माजी जिल्हाध्यक्ष उषा धामणे, मंगल चव्हाण  विजया नानकर  तसेच दंत महाविद्यालयाचे संचालक डॉ सुभाष भोयर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संचालक डॉ. दत्तात्रय शेळके,  छ. शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांची उपस्थिती होती.                                                                        सदरील कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. पारस मंडलेचा यांनी कोव्हीड १९ लसीकरण मोहिमेबाबत माहिती दिली. व कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकने आयोजित केलेल्या या मेगा व्हॅक्सिनेशन ड्राइव्हचे कौतुक केले. सदरील उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यासाठी मोठा फायदा होईल आणि लसीकरणाचे उद्धिष्ट पूर्ण होईल असे मत व्यक्त केले.  या लसीकरण मेळाव्यामध्ये लस घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब औरंगाबादतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित  पुस्तक भेट देण्यात आले.                                                             

सदरील उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, संस्थेचे सचिव पद्माकर मुळे व इतर मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रम यशस्वीपणे  राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुख यामध्ये प्रा. अनिकेत सोनवणे, प्रा. संदीप मदन, प्रा.हरिष रिंगे, प्रा. सचिन काकडे,  प्रा.चंद्रशेखर रहाणे,  प्रा.माधव नरंगले, प्रा. विजय शेळके , प्रा.सागर आव्हाळे,  प्रा. भारत धनवडे  व सर्व स्टाफ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलास तिडके यांनी केले.