औरंगाबाद व नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक ,दोन्ही जिल्ह्यांत 450 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

नांदेड जिल्ह्यात 474 व्यक्ती कोरोना बाधित

औरंगाबाद,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 71 जणांना (मनपा 60, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 519 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 52 हजार 16 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1839 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (410)

संभाजी नगर 1, रामनगर 2, मिनी घाटी 1, चिकलठाणा 5, एन-3 येथे 3, गजानन नगर 1, हर्सुल 3, बीड बायपास 13, सातारा परिसर 3, समता नगर 1, वानखेडे नगर 1, पडेगाव 9, भावसिंगपुरा 1, म्हाडा कॉलनी  5, जुना बाजार 1, मयूरनगर 2, एन-8 येथे 4, पिसादेवी 1,  ब्रिजवाडी  1, भारत नगर 1, होनाजी नगर 1, एन-7 येथे 3, मोंढा नाका 1, खडकेश्वर 1, एन-5 येथे 3, नारेगाव 1, बायजीपुरा 1, एन -6 येथे 5, जयभावनी नगर 4, जीएमसी कॅम्पस 1, एन -11 येथे 1, सिम्प्ली सिटी 1, दर्गा रोड 1, गारखेडा 3, पिसादेवी 1, कल्पवृक्ष सोसायटी 1, सिडको 1, समर्थ नगर 3, कॅनरा बँक 1, बन्सीलाल नगर 1, औरंगपुरा 1, राज नगर 1, सूतगिरणी चौक 1, टिळकनगर 1, मुकुंदवाडी 2, अन्य 310

ग्रामीण (74)

औरंगाबाद 24, फुलंब्री  2, गंगापूर 11, कन्नड 7, खुलताबाद 1, सिल्लोड 4, वैजापूर 10, पैठण 14, सोयगाव 1

नांदेड जिल्ह्यात 474 व्यक्ती कोरोना बाधित तर 35 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 17 अहवालापैकी 474 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 435 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 789 एवढी झाली असून यातील 88 हजार 26 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 108 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 328, नांदेड ग्रामीण 23, अर्धापूर 5, देगलूर 9, हदगाव 1, हिमायतनगर 1, कंधार 14, किनवट 1, लोहा 17, मुदखेड 2, मुखेड 11, नायगाव 1, उमरी 1, परभणी 5, अकोला 2, अहमदनगर 1,हिंगोली 7, पुणे 1, अमरावती 1, वाशीम 1, पंजाब 2, उत्तराखंड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, बिलोली 6, देगलूर 1, हदगाव 4, किनवट 3, मुदखेड 4, मुखेड 1, नायगाव 1, लातूर 1 असे एकुण 474 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 29, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज 1 हजार 108 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 205, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 853, खाजगी रुग्णालय 10 अशा एकुण 1 हजार 108 व्यक्ती उपचार घेत आहेत.