ओमिक्रॉन-कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा प्रशासनाचे निर्बंध

औरंगाबाद,१० जानेवारी / प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रॉन, कोविड 19 प्रकरणांची वाढ नोंदली गेली आहे. गेल्या आठवड्यात राज्यात कोविड 19 ची प्रकरणेही वेगाने वाढू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्‍हा क्षेत्राकरीता खालील बाबींसाठी पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू करुन जिल्हा क्षेत्रात कोविड-19 विषाणू प्रार्दूभाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता व  महानगरपालिका आयुक्त  आस्तिककुमार पांडेय यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जिल्ह्यात आजपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्‍वये कायदेशीर कारवाईस, दंडनीय तसेच साथरोग कायदा 1897 अन्‍वये कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

अ.क्र.बाब / तपशीलनिर्बंधांबाबत सूचना
1नागरिकांच्या संचार (Movement) संबंधी सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना·        जमावबंदी (5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मज्जाव) सकाळी 05.00 ते रात्रौ 11.00 वाजेपर्यंत,·        संचारबंदी रात्रौ 11.00 ते  सकाळी 05.00 पर्यंत नागरिकांच्या संचारावर कडक नियंत्रण असेल.·        फक्त अत्यावश्यक कामे वगळून
2शासकीय कार्यालये·        महत्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगी अथवा पूर्व-परवानगीने/नियोजित भेट (Pre-appointment) शिवाय आगन्तुकास (visitors) बंदी.·        कार्यालय प्रमुखांनी नागरिकांसाठी Video-Conferencing सुविधेची व्यवस्था करावी .·        बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी Video-Conferencing द्वारे बैठकीची व्यवस्था·        कार्यालय प्रमुखाच्या गरजेनुसार Work From Home ला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचा-यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळामध्ये बदल करणे याकरीता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळामध्ये बदलाचे देखील नियोजन करावे.·        कार्यालय प्रमुखांनी कोविड 19 शिष्टाचार Covid-19 Appropriate Behavior (CAB) काटेकोर पालन केले जाईल, याची दक्षता घ्यावी.·        कार्यालय प्रमुखांनी Thermal Scanners, Hand-Sanitizers उपलब्ध करून द्यावेत.
3खाजगी कार्यालय·        खाजगी कार्यालय व्यवस्थापनाने Work From Home ला प्रोत्साहन द्यावे. कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करत कर्मचाऱ्यांची संख्या Rationalize( परिस्थितीनुरुप ) करावी.·        कार्यालयात 50% पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. तसेच कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळामध्ये बदल करण्याचाही विचार करतील काही कार्यालये 24 तास सुरु ठेवून टप्याटप्याने कामे करण्याबाबत नियोजन करण्यात यावे.·        कार्यालयीन कामकाजाच्या वेळा विषम (Odd) असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामांसाठी ओळखपत्र (ID) दाखवून अत्‍यावश्‍यक सेवा सदरातून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशा प्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचा-यांची सुरक्षितता आणि सुविधेबाबत नियोजन करावे.·        लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात व प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे.·        कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्व काळ कोविड 19 प्रतिबंधक शिष्टचाराचे Covid Appropriate Behavior (CAB) तंतोतंत पालन करणे अनिवार्य याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी.·        कार्यालय व्यवस्थापनाने Thermal Scanners, Hand-Sanitizers उपलब्ध करून द्यावेत.
4विवाह संमारंभ50  लोकांच्या उपस्थितीत
5अंत्यविधी20 लोकांच्या उपस्थितीत
6सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक-कार्यक्रम, राजकीय मेळावे50  लोकांच्या उपस्थितीत
7शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग (Coaching Classes)खाली दिलेल्या बाबी वगळता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील·        विविध शैक्षणिक बोर्डाकडून / मंडळाकडून 10वी आणि 12 वी च्या विद्यार्थासाठी राबावयाचे उपक्रम·        प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापना  व्यतिरिक्त करावयाचे कामकाज·        शालेय शिक्षण विभाग कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग महिला व बाल विकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम·        यानिर्बंधांना अपवादात्‍मक स्थितीत बदलासाठी संबंधित विभागास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (SDMA) परवानगी घायवी लागेल.
8जलतरण तलाव (Swimming Pool)/ वेलनेस सेंटरजीम/ स्पा/ ब्युटी पार्लर-सलूनअ)  जलतरण तलाव/ वेलनेस सेंटर/ स्पा पूर्णपणे बंद राहतीलब)    जीम/ ब्युटी पार्लर-सलून-  50% क्षमतेने व पूर्ण वेळ मास्‍क न काढता करावयाच्‍या Activity सह सुरु राहतील. याबाबत बाब क्र.9 मधील हेअर कटींग सलून मधील नमूद सर्व अटी/निर्बंध लागू राहतील.
9हेअर कटींग सलून·        50% क्षमतेने·        रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील.·        ज्या कटींग सलून मध्ये कटींग व्यतिरीक्त इतर सेवा सुविधा आहेत.अशा सलून्स मध्ये केवळ हेअर कटिंग सेवाच सुरु राहील·        सर्व हेअर कटींग सलून्सनी कोविड 19 प्रतिबंधक शिष्टचाराचे Covid Appropriate Behavior (CAB) तंतोतंत पालन करणे अनिवार्य·        सलून्स मध्ये कार्यरत सर्व केस कापणा-या मनुष्यबळाचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बांधणकारक आहे.
10क्रीडा स्पर्धा /क्रीडा महोत्सव·        आधीच जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खालील नियमांचे पालन करून सुरु राहतील.·        प्रेक्षकांना बंदी·        सर्व खेळाडू व अधिकारी यांचे साठी Bio-Bubble·        सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील.·        सर्व खेळाडू व अधिका-यांसाठी दर 3 दिवसांनी RT-PCR/RAT आवश्यक·        शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांचे शिबिर, स्पर्धांच्या आयोजनास बंदी राहील. 
11मनोरंजनाची स्थळे(Entertainment Park),प्राणी संग्रहालये,किल्ले,तिकीट बुकिंग द्वारे/सशुल्क ठिकाणे/नागरिकांसाठीचे कार्यक्रम,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) द्वारे जिल्ह्यातील कोविड 19 स्थिती लक्षात घेऊन घोषित केलेली स्थळे   इत्यादी.पूर्णपणे बंद राहतील
12शॉपींग मॉल्स, बाजार संकुले, यामध्ये बंधनासह प्रवेश (With Restricted Entry)·        सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल·        तथापि सदर मॉल्सची एकूण क्षमता आणि प्रवेश दिलेल्या ग्राहकांची संख्या याबाबत प्रवेश द्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्‍पष्‍ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे.·        सर्व ग्राहक व तेथील कार्यरत कर्मचारी व सर्व मनुष्यबळ यांनी कोविड 19 प्रतिबंधक शिष्टाचाराचे Covid Appropriate Behavior (CAB) तंतोतंत पालन करणे अनिवार्य. याबाबत दक्षता घेण्यासाठी मार्शल्स नेमावेत.·        सदर ठिकाणी कोविड-19 Rapid Antigen Test (RAT) चाचणी करिता बुथ/ किऑस्क उपलब्ध ठेवण्यात यावे.·        दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल.·        दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर आस्थापना बंद असतील.
13रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी·        सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी एकूण क्षमता आणि प्रवेश दिलेल्या ग्राहकांची संख्या बाबत प्रवेश द्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे.·        दोन्ही लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच केवळ प्रवेश देण्यात यावा. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अस्थापना व्यवस्थापक व मालकाची असेल.·        नमूद आस्थापना दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.·        घरपोच सेवा (Home Delivery) दररोज  सुरु ठेवता येईल.
14नाट्यगृह/चित्रपटगृहे इ.·        सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर नाट्यगृह व चित्रपटगृहाची एकूण क्षमता आणि प्रवेश दिलेल्या प्रेक्षकांची एकूण संख्या याबाबत प्रवेश द्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्प्ष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे.·        दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल.·        दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर आस्थापना बंद राहतील.
15आंतरराष्ट्रीय प्रवास     केंद्र शासनाचे निर्देशाप्रमाणे
16देशांतर्गत प्रवास·        महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा  प्रवासाचे 72 तासांपूर्वी पर्यंतचे RT-PCR नकारात्मक (RT-PCR Test –Negative Report) अहवाल सोबत असणे गरजेचे आहे.·        सदर बाब हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक सेवेने  प्रवास करणाऱ्या व्यक्तीना/प्रवाशांना देखील लागू असेल.·        दोन्‍ही डोस लसीकरण हा नियम वाहनचालक/क्लीनर्स/इतर सहयोगी कर्मचारी व मनुष्यबळास पालन करणे बंधनकारक राहील.
17कार्गो सेवा-वाहतूक, औद्योगिक प्रकल्प /उपक्रम व उत्पादन सेवा, बांधकाम सेवा व कार्ये इ.·        दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींकडून सेवा देण्यास मुभा राहील.
18सार्वजनिक वाहतूक व्यवस्था·        दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींकरिता नियमित वेळेत सुरु असतील.
19केंद्रीय लोकसेवा आयोग/राज्य लोकसेवा आयोग/वैधानिक प्राधिकरणे/संस्था,सार्वजनिक संस्था इ.द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा·        राष्ट्रीय पातळीवरुन आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षां करिता केंद्र शासनाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. सदर परीक्षांकरितांचे प्रवेशपत्र हे अत्यावश्यकता सिद्ध करण्यास व त्याअंतर्गत हालचालीस वैध पुरावा असेल.·        राज्य पातळीवरुन आयोजित होणाऱ्या परीक्षां संदर्भात ज्या परीक्षांचे ओळखपत्र जारी करण्यात आले आहेत अशा परीक्षा नियोजनाप्रमाणे घेता येईल. तथापि इतर सर्व परीक्षां करिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (SDMA) पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल.·        उक्त नमूद सर्व परीक्षेदरम्यान कोविड 19 प्रतिबंधक शिष्टाचाराचे Covid-19 Appropriate Behavior (CAB) नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. तसेच याबाबींचे काटेकोर पालन होत असल्याच्या खात्री करीता व त्याबाबत  दक्षतेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(DDMA) निरीक्षक नेमतील.
उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.        1)मास्क वापरणे  2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3) सॅनिटायझर 4) आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य

1.     हालचालींकरिता वैध अत्यावश्यक बाबी:-

1.     वैद्यकीय तातडीच्या बाबी

2.    अत्यावश्यक सेवा (अत्यावश्यक सेवांची यादी परिशिष्ट-1 मध्ये दिलेल्यानुसार राहील)

3.    विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन येथे जाणे किंवा येण्यासाठी वैध तिकीटासह 

4.   24 तास सुरु राहण्यासाठी कार्यालयासाठी,विविध शिफ्ट जे कार्यायले 24 तास सुरु असतील अशा कार्यालयांचे कर्मचाऱ्यांकरिता विहीत ओळखपत्रासह (ID) प्रवास अत्‍यावश्‍यक बाबींमध्‍ये गणला जाईल.

2.    कोविड19 प्रतिबंधक शिष्टाचाराचे Covid Appropriate Behavior (CAB) नियम सदर आदेशासह संलग्नित परिशिष्ट-2 प्रमाणे असतील.

3.    मॉल्स, दुकाने, रेस्टारंन्ट, उपहारगृहे, हॉटेल, ई-कॉमर्स सेवा, होम-डिलीव्हीरी/पार्सल सेवा व त्या अंतर्गत कार्यरत संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्‍यास सदर आस्थापना जिल्हा आपत्तीव्यस्थापन प्राधिकरणा कडून बंद (Seal) करण्यात येईल.सदर अस्थापना /दुकाने/सेवा संबंधित ठिकाणी वेळोवेळी कोविड-19 RAT चाचणी करण्यात यावी.

4.   ज्या जिल्‍ह्यात (शहर+ग्रामीण भाग) लसीकरण कमी झालेले आहे. त्या जिल्‍ह्यात निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असतील.अथवा याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास याबाबत मार्गदर्शन मागवून अथवा पूर्व-परवानगीने निर्बंधा बाबत निर्णय घेतील.

5.    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) जिल्ह्यातील कोविड-19 साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व व्यवस्थापनाकरिता कुठल्याही आस्थापनेचे अधिकारी/कर्मचारी/मनुष्यबळ अथवा संसाधने(Resources) शासकीय-निमशासकीय कार्यालये/संस्था मधील मनुष्यबळ तसेच शासकीय अनुदान मिळणा-या सर्व संस्‍था यांच्‍या संसाधनाचा विनियोग करण्याचा व मागणी करण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहील.

6.    लोकजागृतीतून लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात यावा. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांचे, 100% लसीकरण (प्रथम मात्रा : First Dose) झाले पाहिजे. लसीकरणाचा दुसरा डोस Covishield -84 दिवस व Covaxin-28 दिवसांनी घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रथम मात्रा विहित कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांकडे “हर घर दस्तक व माझा वार्ड शतप्रतीशत लसीकरण वार्ड” या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या डोससाठी सतत पाठपुरावा करावा.

7.   माझीभूमी संतांची भूमी : संतांच्या भूमीत करुया 100% लसीकरण  या कार्यक्रमातंर्गत पाठपुरावा करावा व ठोस जनप्रबोधन करुन लसीकरण मात्रा वाढवावी.   

8.    Covid Appropriate Behavior (CAB) उल्लंघन करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.

परिशिष्ट-1

अत्यावश्यक सेवा

1.     अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील सेवांचा समावेश होतो:-

1.     रुग्णालये, रोगनिदान केंद्रे (Diagnostic Centers),चिकित्सालये,वैद्यकीय विमा कार्यालये,औषध विक्रेते, औषध निर्माण कंपन्या, इतर उत्पादन व वितरणासह वैद्यकीय व आरोग्य सेवा तसेच त्यांचे डीलर्स, वाहतूक व वितरण साखळी. कोविड साथरोग संबंधी लस,सॅनिटायझर,मास्क,वैद्यकीय साहित्ये, कच्चे उत्पादने/सेवा इ.

2.    व्हेटरीनरी हॉस्पीटल्स/पशुवैद्यक केअर सेंटर्स व पशु खाद्य दुकाने

3.    वनविभागाने घोषित केलेले वनीकरणा संदर्भातील कामे

4.   हवाई सेवा आणि संबंधी सेवा (एअरलाईन, विमानतळे, देखभाल, कार्गो, इंधन, सुरक्षा इ.)

5.    किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळविक्रेते, दूधपुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, Confectionaries, मिठाईची दुकाने व इतर सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने(कच्चे/शिजवेले/प्रक्रिया केलेले अन्न)

6.    कोल्स्ड स्टेारेज व वेअरहाऊस संबंधित सेवा

7.   सार्वजनिक वाहतूक सेवा, विमाने, रेल्वेगाड्या, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक बस.

8.    विविध देशांच्या राजदूतांच्या कार्यालयांच्या कामकाजाशी संबंधित असलेल्या सेवा.

9.     स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व कामे.

10.स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा.

11. भारतीय रिझर्व बँकेने विनियमित केलेल्या संस्था

12.सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ

13.टेलिकॉम सेवाशी संबंधित देखभाल/दुरुस्तीची कामे

14. मालवाहतूक.

15.पाणी पुरवठाशी संबंधित कामे

16.कृषी संबंधित सेवा व बी-बियाणे, खते, साहित्ये, दुरुस्ती इ. दुकाने या माध्‍यमातून कृषी क्षेत्र निरंतर/अखंडीत कार्यरत राहील.

17.सर्व प्रकारच्या उत्पादना संबंधी निर्यात-आयात

18.ई- वाणिज्य (केवळ अत्यावश्यक साहित्यांचे पुरवठासंदर्भात)

19.अधिस्वीकृत प्रसारमाध्यमे

20.पेट्रोलपंप आणि पेट्रोलियमशी संबंधित असलेली उत्पादने

21.सर्व कार्गो सेवा

22.डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित

23.महत्वाच्या पायाभूत सुविधा सेवा

24.शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा

25.इलेक्ट्रिक व इंधन गॅस पुरवठा