वैजापूर वकील संघ ग्राहक संस्थेच्या अध्यक्षपदी सोपान पवार यांची बिनविरोध निवड

वैजापूर ,९ जानेवारी/प्रतिनिधी :- वैजापूर वकील संघ ग्राहक संस्थेच्या अध्यक्ष पदी अँड सोपान पवार यांची बुधवारी निवड करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष अँड हरीभाऊ जानेफळकर यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

नवीन अध्यक्ष निवडीसाठी अँड प्रमोद  जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची सभा घेण्यात आली.या सभेत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ख्रिस्ती व टी.एन. गोमलाडु यांनी सभेचे कामकाज पाहिले.त्यांना कर्मचारी योगेश पवार यांनी सहाय्य केले.

Displaying IMG-20220105-WA0227.jpg

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष पवार यांच्यासह संचालक रियासत अली, आर. डी. थोट प्रवीण साखरे, सविता पाटणी-दहिभाते, नुजहत बेगम ,एस.आर. बारसे यांची सभेस उपस्थिती होती. नवनिर्वाचित अध्यक्ष सोपान पवार यांचे  जिल्हा वकील संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल रोठे, सचिव सईद अली, आसाराम रोठे, के.बी.कदम , एस.एस.ठोळे, अशोक चव्हाण, मनोहर दिवाकर, जे. डी.हरिदास, ए. एम. बागुल, व्हि. जी. वाघ, आर.पी.बोडखे, मजहर बेगम , राफे हसन, संतोष जेजुरकर, संजय बत्तीसे, किरण त्रिभुवन, शरद हारदे, संदीप पाटील, संदीप डोंगरे, सचिन मगर, रविराज शिंदे ,देविदास बावचे, पवन राजपूत, कुणाल हरिदास आदींची उपस्थिती होती.