वैजापूरात गुरू गोविंदसिंग यांची जयंती विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरी

वैजापूर ,९ जानेवारी / प्रतिनिधी :- शिखांचे दहावे गुरू आणि खालसा पंथाचे संस्थापकगुरू गोविंदसिंग  यांची 355 वी जयंती रविवारी येथे विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरी करण्यात आली.

Displaying IMG-20220109-WA0065.jpg

गुरू गोविंदसिंग  हे एक ऊर्जा स्रोत होते, केवळ वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांची गादी स्वीकारून या भुतलावरील सर्व मानव समान असून सर्वांचा परमपिता एकच सृजन शक्ती असल्याचा संदेश त्यांनी आपल्या वाणीतून दिला. गुरूजींनी कधीही मंदिर – मस्जिद व पुराण आणि कुराण मध्ये भेद केला नाही. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांनी याप्रसंगी येथील गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. 

गुरुजींनी सदैव अधर्म,अत्याचार,अनीतीचा  प्रतिकार केला असेही श्री.राजपूत पुढे म्हणाले .गुरू गोविंदसिंघ जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी त्यांच्या प्रतिमेची प्रभात फेरी काढण्यात आली.

गुरुद्वारात पोथी पठण करण्यात आले. लहान मुलांनी पायी चालून विविध गुणदर्शन केले. त्यांना राजपूत यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. नंतर महाप्रसाद देण्यात आला.दुपारी रहनसवाई नांमक कार्यक्रम झाल्यावर सर्वांना लंगरचे जेवण देण्यात आले. यात दिलजीतसिंग खनिजो, प्रितीकौर खनिजो,सुरजितकौर इनप्रीत खनिजो, गुरुज्योत यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या प्रसंगी मनोज पंजाबी, रमेश पंजाबी ,राजकुमार शेठ आहुजा,अमरजित कौर पोथीवाल, गुरू ग्यानसिंग  पोथीवाल, चरणजितसिंग  बलविंदर पोथीवाल,सुमित पोथीवाल, संतोष प्रसाद, श्रीमती पंजाबी, अमरीकसिंग , इकबालसिंग  तसेच शीख,पंजाबी,सिंधी या सर्व समुदायातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी प्रीती कौर खनिजो व गुरू ग्यानसिंग  यांनी समारोप केला,