आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विकास कामांचे शिऊर येथे भूमिपूजन

वैजापूर ,१ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- ग्रामविकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे भूमिपूजन व जिल्हा क्रीडा विभागांतर्गत मंजूर झालेल्या जिल्हा परिषद शाळेला क्रीडा साहित्याचे वाटप भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव यांच्याहस्ते सोमवारी झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रमेश पाटील बोरणारे होते.

आ रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामविकास योजनेअंतर्गत शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी संस्थान परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे याकामासाठी 10 लक्ष रुपये व जिल्हा क्रीडा विभागातर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी  क्रीडा साहित्यासाठी 3 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, भाजपचे जेष्ठ नेते जे.के.जाधव,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप,जिल्हा बँकेचे संचालक रामहरीबापू जाधव,मा.जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश केळे, उपतालुकाप्रमुख बबनराव जाधव, मा.उपसभापती राजेंद्र चव्हाण,गोकुळ पाटील आहेर, सुभाषराव जाधव, सरपंच राजश्री जाधव, उपसरपंच रामेश्वर जाधव, प्रकाश वाघ,नंदू जाधव, नितीन चुडीवाल, बाबासाहेब चेळेकर,शिवाजी साळुंके, सोमनाथ महाराज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.