प्रल्हाद, सुहानी, प्रतिक्षा, यश, कविता, किशोर, पुनम, जगदीश ठरले पावनखिंड युवा दौड क्रॉस कंट्री स्पर्धेचे विजेते

जय भवानी जय शिवाजी च्या गर्जना देत धावले हजारो युवक

औरंगाबाद,१९ डिसेंबर /प्रतिनिधी:- पावनखिंड युवा दौड क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रल्हाद, सुहानी, प्रतिक्षा, यश, कविता, किशोर, पुनम, जगदीश हे  धावपटू विजेते   ठरले आहेत.

Displaying 00567.JPG

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथेच्या सन्मानात आयोजित पावनखिंड युवा दौड क्रॉसकंट्री स्पर्धेत हजारो युवकांनी सहभाग नोंदवत विजेतेपद मिळविण्यासाठी आपलं पणाला लावले. स्पर्धेचे उ्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निसर्गमय परिसरात सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक कन्हैयालालजी शहा यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे अध्यक्षस्थानी होते तर यावेळी देवगिरी नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड, विद्यापीठाचे सिनेट सदस्या डॉ. योगिता तोर पाटील, नरहरी शिवपुरे आणि औरंगाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉक्टर फुलचंद सलामपुरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

Displaying 0567.JPG

स्पर्धेचे निकाल
खुला गट पुरुष १० किलोमीटर-१) प्रल्हाद धनावत २) कुलदीप चव्हाण ३) प्रदीप राजपूत
खुला गट महिला १० किलोमीटर-१) पुनम वाणी २) भाग्यश्री सुरमारे ३) ज्योती जोरे
१६ वर्षाखालील मुली २ किलोमीटर-१) सुहानी खोब्रागडे २) गीतांजली राऊत ३) हर्षदा कदम

Displaying 0000567.JPG


१६ वर्षाखालील मुले २ किलोमीटर-१)यश जाधव २) विश्वास राठोड ३) लक्ष्मण पवार
१८ वर्षाखालील मुले ६ किलोमीटर-१) किशोर ताम्हाणे २) जीवन वाठोरे ३) मच्छिंद्र दुधे
१८ वर्षाखालील मुली ४ किलोमीटर-१) प्रतिक्षा काळे २) शीतल जाधव ३) कल्याणी भोपळे.
२० वर्षाखालील मुली ६ किलोमीटर – १) कविता पुरी २) रूपाली बादुगे ३) तेजस्विनी दळे
२० वर्षाखालील मुले ८ किलोमीटर– १) जगदीश राठोड २) सुनील धांडे ३) सचिन चव्हाण.

स्पर्धेतील विजेत्यांना मेडल टी शर्ट व प्रमाणपत्र देऊन विद्यापीठ विकास मंचाचे डॉक्टर गजानन सानप, इंडियन कॅट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे, स्पर्धेचे तांत्रिक समिती प्रमुख डॉक्टर दयानंद कांबळे, उद्योजक विजयराव खाचणे, गोपाल पांडे, डॉक्टर मीनाक्षी मुलीआर यांचे हस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिराडे यांनी केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद ॲथलेटिक्स संघटनेचे अनिल नीले, प्राचार्य शशिकला निळवंत, राहुल अहिरे, डॉ सचिन देशमुख तर क्रीडा भारती चे डॉक्टर संदीप जगताप आणि प्राध्यापक विनायक राऊत यांच्यासह ॲथलेटिक्स संघटनेचे पंच यांनी परिश्रम घेतले.