वैजापूर पोलिसांचा ‘कोरोना योध्दा’ सन्मानपत्र देऊन सन्मान

वैजापूर ,२१ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- कोरोनाशी आज संपूर्ण देश लढत आहे.अशा कठीण प्रसंगात पोलीस कर्तव्य बजावून समाज आणि समाजातील लोकांसाठी सेवा कार्य करणाऱ्या वैजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली औरंगाबाद शाखेतर्फे ‘कोरोना योध्दा’ सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Displaying IMG-20211118-WA0193.jpg

कोरोना काळात कर्तव्य बजावत असतांना सामाजिक बांधिलकी म्हणून बधितांना उपचार घेण्यासाठी मदत व सहकार्य करणाऱ्या वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत, गोपनीय शाखेचे संजय घुगे, पोलीस नाईक मोईज नसीम बेग, पो.हे.का.भगवान तेलंगे, सूर्यकांत रामदास मोटे (पोलीस पाटील,गोयगांव), कारभारी रामहरी निघोटे (हडसपिंपळगांव),किशोर शिवाजीराव चव्हाण आदींचा पोलीस मित्र संघटनेच्यावतीने ‘कोरोना योध्दा’ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बलजीतसिंग लांबा,जिल्हाध्यक्ष अशोक वरकड,तालुकाध्यक्ष रईस फेरोजखान, उपाध्यक्ष मजनू पठाण,तालुका संघटक भगवान गाजरे,प्रीती मेहेर,दिनेश खरात, स्वछतादूत ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत,, शिवसेना शाखाप्रमुख आवेज खान आदी उपस्थित होते.