औरंगाबाद जिल्ह्यात 43748 कोरोनामुक्त, 472 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 59 जणांना (मनपा 50, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43748 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45418 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1198 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 472 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (28)न्यू हनुमान नगर (1), उल्कानगरी (1), स्वातंत्र्यसैनिक कॉलनी (1), पांडे भवन, किराना चावडी (1), तानाजी नगर, नामनगर (1), एन-5 सिडको, श्रीनगर (1), गारखेडा, न्यू जय भवानी हाऊसिंग सोसायटी (1), एन-5 सिडको (2), शहानूरवाडी, देवा नगरी (1), पुंडलिक नगर (2), अन्य (16)

ग्रामीण (04) कन्नड (1), अन्य (3)