डॉ.शेंडगे यांना अटक होणार

वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या डॉक्टरने मागे घेतला अटकपूर्व जामीन अर्ज 

नारायण गोस्वामी
उमरगा ,१८ नोव्हेंबर :-
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या , रुग्णाची आणि  शासनाची करोडो रुपयेची फसवणूक करणाऱ्या येथील डॉक्टर आर डी शेंडगे यांनी औरंगाबाद खंडपीठातील  अटकपूर्व जामीन अर्ज   मागे घेतला. आता त्यांना अटक होण्याशिवाय पर्याय नसून ,आरोपी  शेंडगे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे .  

High Court Of Bombay-Aurangabad Bench | Official Website of e-Committee,  Supreme Court of India | India

येथील पोलिस ठाण्यात डॉक्टर आर डी शेंडगे यांच्याविरूध्द फसवणूकचा गुन्हा दाखल झाल्यापासून ते  फरार आहेत . त्यांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयातअटकपुर्व जामीन अर्ज केला होता. तो अर्ज  जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला . यामुळे आरोपी डॉक्टर  शेंडगे यांनी मुंबई  उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपुर्व जामीन अर्ज केला होता . जामीन मिळणार नाही असे लक्षात येताच डॉक्टर शेंडगे यांनी अटकपुर्व जामीन अर्ज  मागे घेतला.त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असून त्यांना शरणागती शिवाय पर्याय नाही . 

बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . . विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले. 

आर डी शेंडगे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे लॅब ब्लड रिपोर्ट गरजेनुसार कमी जास्त म्हणजे चुकीचे बनविल्या प्रकरणी व रुग्ण ऍडमिट नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून वैद्यकीय बील उचलल्या प्रकरणी उमरगा येथील डॉ शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे व तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे यांना त्रिसदस्यीय चौकशी समितीने दोषी ठरविले आहे. चौकशी समितीने या घोटाळ्या प्रकरणी चौकशी अहवालानुसार पोलिसात तक्रार द्यायचा प्रयत्न केला होता माता त्यावेळी गुन्हा नोंद झाला नव्हता . अखेर त्यात गुन्हा नोंद झाला आहे.गुन्हा दाखल झाल्याबरोबर डॉक्टर आर डी शेंडगे हे अद्याप फरार आहेत .