वैजापूर शहरातील लक्ष्मीनगर न.प.प्राथमिक शाळेत आ. बोरणारे यांच्या उपस्थितीत प्रारूप मतदार यादीचे वाचन

वैजापूर ,१८ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- निवडणूक आयोगातर्फे दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासहमतदार नोंदणीचा संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार वैजापूर शहरातील लक्ष्मीनगर येथील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत  आज प्रारूप मतदार यादी वाचनासाठी वार्ड सभा घेण्यात आली.

आ.रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी,माजी  नगराध्यक्ष साबेरखान, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांच्या उपस्थितीत मतदार यादीचे वाचन करण्यात आले. नगरसेवक दशरथ बनकर,दिनेश राजपूत, महेश बुणगे, नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी मनीष गणवीर यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.

संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील.20 डिसेंबरपर्यंत त्या निकाली काढण्यात येणार आहेत.5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांच्या नावाची मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार जुन्या यादीत असलेल्या नावांमधील दुरुस्त्या व फोटोच्या दुरुस्त्या केल्या जातील.अंतिम मतदार यादी सन 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिका,नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र मतदारांनी मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी यावेळी केले.