औरंगाबादध्ये ईडीचे छापे: उद्योजक, व्यावसायिक रडारवर

औरंगाबाद,११नोव्हेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद शहरातील उद्योजक, व्यावसायिक  देखील ईडीच्या निशाण्यावर आहेत. आज दुपारी बारा वाजल्यापासून दोन मोठ्या व्यावसायिकांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. बिल्डर आणि बियाणे कंपनीशी संबंधित या मोठे व्यक्ती आहेत. अजुनही ईडीचे धाडसत्र सुरूच आहेत. 

औरंगाबाद शहरातील अदालत रोड वरील कार्यालयात आणि नक्षत्रवाडी परिसरातील कार्यालयात आणि घरी हे छापे टाकण्यात आले आहेत. या दोन बड्या उद्योजकांच्या सात वेगवगळ्या ठिकाणांवर छापासत्र सुरू आहे. यामध्ये हिशेब नसलेली संपत्ती आणि मनी लाँड्रींगच्या आधारे हे छापासत्र सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.या धाडींसाठी ईडीच्या 54 अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले असून व्यावसायिक आणि उद्योजकांची घरे व आस्थापनांवर छापे टाकले जात आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक बडे नेते आणि उद्योजकांविरोधात ईडीचं धाडसत्र सुरु आहे. ईडीच्या रडावर आता औरंगाबादमधील उद्योजक आणि व्यावसायिक आहेत.