एअर इंडियाची नियोजनबद्ध निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण,69 वर्षानंतर एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे

नवी दिल्ली, २७ जानेवारी / प्रतिनिधी :-एअर इंडियाच्या धोरणात्मक नियोजनबद्ध निर्गुंतवणूक व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र सरकारला, या व्यवहारातील भागीदार मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेड (मेसर्स टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी) कडून 2,700 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. तसेच, 15,300 कर्ज, एअर इंडिया आणि AIXL कडेच ठेवण्यात आले आहे. एअर इंडियाचे सर्व शेअर्स या कंपनीच्या नावे करण्यात आले आहेत.

 भारत सरकारने सुमारे 69 वर्षांपूर्वी टाटा समुहाची कंपनी विकत घेतली होती. परंतू पुन्हा कंपनीची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे जाणार आहे. गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने बोली लावल्यानंतर 18,000 कोटी रुपयांना टाटा ग्रुपच्या एअर इंडियाला टेल्स प्रायव्हेट लिमिटेडला विकले.

इथे हे ही सांगणे औचित्याचे ठरेल की मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेड ने एअर इंडियाच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सर्वाधिक बोली लावल्यामुळे या बोलीला केंद्र सरकारने मंजूरी दिली होती. त्यानुसार, बोली जिंकणाऱ्या कंपनीला 11 ऑक्टोबर 2021 रोजी, इरादापत्र देण्यात आले होते. तसेच समभाग खरेदी करार, 25 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आला होता. त्यानंतर, या व्यवहारातील भागीदार, (M/s Talace Pvt Ltd) एअर इंडिया आणि केंद्र सरकारने एकत्रित बसून या व्यवहारासाठीच्या सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या. यात अॅंटी ट्रस्ट बॉडीज, नियामक, कर्जदाता संस्था आणि तिसऱ्या पक्षांकडून मंजूरी मिळवण्याचाही समावेश होता. दोन्ही बाजूंच्या परस्पर सहमतीने या अटी शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या.

टाटा समूहाची ही तिसरी एअरलाइन 
एअर इंडियाच्या विक्रीच्या घोषणेच्या तीन दिवसांनंतर, गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी, टाटा समूहाला एक पत्र जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये सरकारने त्यांचे 100 टक्के हिस्सा विकण्याचे स्पष्ट केले.
2003-04 नंतर केंद्र सरकारकडून करण्यात आलेले हे पहिले खाजगीकरण आहे. त्याचवेळी एअर इंडिया हा टाटाचा तिसरा एअरलाइन ब्रँड असेल. कारण कंपनीकडे आधीच AirAsia India आणि Vistara मध्ये भागीदारी आहे.