कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा 20 कोटीचा टप्पा भारताने केला पार,गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णांमध्ये 91191 ची घट

कोविड – 19 लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 130 दिवसात भारताने गाठला हा मैलाचा टप्पा
हा टप्पा गाठणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 42 टक्के लोकसंख्येला कोविड -19 लसीची किमान एक मात्रा प्राप्त
एकाच दिवसात सर्वाधिक 22.17 लाख चाचण्या
आतापर्यंत देशभरात कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 2,43,50,816 वर पोहोचली

नवी दिल्ली,२६ मे /प्रतिनिधी :-भारतात सलग दहाव्या दिवशी दैनंदिन नवीन रूग्णसंख्या 3  लाखांहून कमी झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासांत 2,08,921 दैनंदिन नवीन रूग्णांची नोंद केली गेली. सक्रीय रूग्णांची एकूण संख्या, देखील कमी होऊनआता 24,95,591 इतकी झाली आहे. 10 मे 2021 रोजी  सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली होती, त्यानंतर मात्र सक्रिय रूग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 91,191 इतकी घट झाली. देशातील सक्रीय रूग्णांची संख्या आता एकूण बाधित रुग्णांच्या 9.19% इतकी आहे.लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा 20 कोटीचा टप्पा 130 दिवसात भारताने पार केला असून, हा टप्पा गाठणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे.

सलग 13 व्या दिवशी, भारतातील दैनंदिन कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या, दैनंदिन रुग्णांपेक्षा अधिक आहे.  गेल्या 24 तासांत 2,95,955 रुग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद केली गेली. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आणखी वाढून 89.66% पर्यंत पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 22,17,320 चाचण्या करण्यात आल्या असून एकाच दिवसात करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या या सर्वाधिक चाचण्या आहेत, आतापर्यंत एकूण 33,48,11,496 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 11.45% वर आहे तर दैनिक पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे आणि आज तो 9.42% वर आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा दर 10% पेक्षा कमी राहिलेला आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड -19 लसींच्या एकूण मात्रांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडल्यामुळे भारताने आपल्या लसीकरण मोहिमेत एक नवीन टप्पा गाठला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 20,06,62,456 लसींच्या मात्रा  28,70,378 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यात 97,96,058 आरोग्य कर्मचारी ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे , 67,29,213 आरोग्य कर्मचारी ज्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली यांचा समावेश आहे, 1,51,71,950 आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर, 83,84,001आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे.18 – 44 वयोगटातील 1,29,57,009 लाभार्थी (पहिली मात्रा), 45 ते 60 वर्षे वयोगटातील 6,20,88,772 लाभार्थी (पहिली मात्रा) 1,00,30,729 लाभार्थी (दुसरी मात्रा), 60 पेक्षा अधिक वयोगटातील 5,71,35,804 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,83,68,920 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 22 कोटींहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 45 वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 34 टक्के व्यक्तींना कोविड -19 प्रतिबंधक लसीची  किमान 1 मात्रा मिळाली  आहे. त्याचप्रमाणे भारतातील 60 आणि त्या  वर्षांवरील व्यक्तींपैकी 42 टक्क्यांहून अधिक जणांना  कोविड – 19 लसीची  किमान 1 मात्रा मिळाली  आहे. 

भारत सध्या, आपल्या  कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये  तीन लसींचा उपयोग करत आहे. यामध्ये, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाज या कंपनीची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची  कोवॅक्सिन या दोन भारतात तयार लसींचा समावेश आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांकडून (DCGI) आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली रशियाची  स्पुटनिक V ही तिसरी लस असून काही खासगी रुग्णालयांमध्ये तिचा उपयोग केला जात असून आगामी काळात तो वाढण्याची अपेक्षा आहे. 

130 दिवसांपूर्वी 16 जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, कोविड- 19 लसीकरणाबाबतच्या  राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने आरोग्य सेवेतल्या व्यक्ती  आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना  (दोन्ही सरकारी आणि खाजगी क्षेत्र) यांना प्राधान्य दिले. लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा 1 मार्च 2021 पासून सुरू झाला. यात  सर्वात जोखमीच्या  वयोगटातील व्यक्तींना संरक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.  या प्राधान्य वयोगटात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विशिष्ठ सह्व्याधी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. यात व्यापकता आणून  1 एप्रिल 2021 रोजी 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसर्‍या टप्प्यात 1 मे 2021 रोजी’ उदार मूल्यनिर्धारण आणि वेगवान राष्ट्रीय कोविड- 19 लसीकरण धोरण’ स्वीकारण्यात आले असून या धोरणाच्या अंतर्गत, 18 वर्षांवरील प्रत्येकजण कोविड-19 लसीकरणासाठी पात्र आहे.

याशिवाय ‘अवर वर्ल्ड इन डेटा’ आणि इतर वृत्तांनुसार कोविड – 19 लसीकरणातील आघाडीच्या देशांमध्ये ब्रिटनने 168 दिवसात 5.1 कोटींचा टप्पा पार केला. ब्राझीलने 128 दिवसात 5.9 कोटी तर जर्मनीने 149 दिवसात 4.5 कोटी लसींचा टप्पा गाठला.