नांदेड जिल्ह्यात 48 कोरोना बाधितांची भर

नांदेड दि. 1 :- शुक्रवार 1 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 48 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 33 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 15 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 41 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 932 अहवालापैकी 866 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 515 एवढी झाली असून यातील 20 हजार 411 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 330 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 573 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 29, बिलोली तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 7 असे एकूण 41 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 82 हजार 614एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 56 हजार 778एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 515एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 411एकुण मृत्यू संख्या-573उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-07आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-664रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-330आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-08.