देशाला अभिमान वाटेल असे क्रीडा विद्यापीठ उभारणार – क्रीडामंत्री सुनिल केदार

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते सत्कार

May be an image of 7 people, people standing, indoor and text that says 'शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य ना. श्री. सुनील केदार मंत्री, क्रीडा युवक कल्याण महाराष्ट्र राज्य गेम्स मा. ना. श्रीमती आदिती तटकरे राज्ववड्री कल्वाण बहाराष्ट्रशव आलिम्पिक २०१८ मधीले भागी खेळाडं क प्राप्त सत्कार समार व क्रीडा रितो हाटे 1, दि.'

पुणे दि.14- जागतिक अंतरावरील सर्वोत्तम अभ्यासक्रम असलेले आणि देशाला अभिमान वाटेल असे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा आणि युवक  कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे म्हाळुंगे-बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रच्या नियामक परिषद सदस्यांच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा  व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया  उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, नियामक परिषदेतील सर्व सदस्य आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ क्रीडा विद्यापीठासाठी होईल. जगाने कौतुक करावे असे आणि महाराष्ट्राच्या नावलौकीकात भर घालेल असे क्रीडा विद्यापीठ उभारायचे आहे. त्यात खेळाडूंसाठी सर्वोत्तम अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्या संदर्भात युजीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. सर्व अडचणींवर मात करीत महाराष्ट्राचे नाव उंचावणारे विद्यापीठ उभे करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून उत्तम खेळाडूंसोबत चांगले मार्गदर्शक घडविले जातील असा निश्चय त्यांनी व्यक्त केला.

 श्रीमती कृष्णा म्हणाल्या, क्रीडा क्षेत्रातील रोजगाराच्या संधीची माहिती युवकांना देण्यात यावी. क्रीडा विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि सुविधांविषयी सोप्यारितीने माहिती देण्यात यावी.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत  नियामक परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केले. पुढील 5 वर्षाचा विचार करून जागतिक स्तराचे विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बैठकीस भारतीय संघाचे माजी गोलकीपर व तांत्रिक समितीचे उपाध्यक्ष हेन्री मेनेझिस, आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू राहुल बोस, सिम्बॉयसिसच्या प्र.कुलगुरू विद्या येरवडेकर, प्रा.रत्नाकर शेट्टी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, सहसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा यांच्या हस्ते सत्कार

May be an image of 8 people, people standing, indoor and text that says 'मा.ना.श्री.सुतीलकेदार मा. ना. श्री. सुनील केदार बंडी, पुवके कल्याण महाराष्ट्र 小 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मा. ना. श्रीमती आदिती तटकरे राज्यमंत्री, क्रीडा युवक कल्याण महाराष्ट्र ज्य टोल्त्यो ऑलिमि गरेम्स २०२० मधील महभागी खेळ न पदक प्राह गौरव सत्कार छाडू व क्री'

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा सत्कार  आणि एशियन गेम्स जकार्ता 2018 मध्ये ब्रीज खेळातील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मागर्दशकांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

May be an image of 7 people, people sitting, people standing, indoor and text that says 'शालेय शिक्षण व क्रीडा व व युवक सेवा संचाल मा. ना. श्री. सुनील केदार संती कीडा कल्याण महाराष्ट्र एशिये टोकियो ऑलिम्पिक र.कमधील मधील सहश जका तील देऊन ालेवाडी'

श्री.केदार म्हणाले, येणाऱ्या पिढीतील खेळाडूंचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येत आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे यासाठी महाराष्ट्र शासन खेळाडूंना सहाय्य करण्यासोबतच त्यांच्या भविष्याची काळजी घेईल. खेळाडू आणि मार्गदर्शक यांच्या सहकार्याने क्रीडा क्षेत्रात राज्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, कोरोना काळात अनेक अडचणी असतानादेखील राज्य शासनाने खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. क्रीडा विद्यापिठाच्या माध्यमातून पुढील ऑलिम्पिकमधील यशाची पायाभरणी होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडूंनी जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या क्रीडा सुविधा आणि क्रीडा विद्यापीठाची माहिती दिल्यास त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीत राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा क्रीडा क्षेत्रातील अनुभव उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.

May be an image of 5 people, people standing, indoor and text that says 'महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मा.ना. मा. ना. श्रीमती आदिती राज्यमंत्री, क्रीडाव युवक कल्य महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.सुनीलकेदार श्री. सुनील केदार कीडा युवक कल्वाण महाराषह्ट्र मेक्ियो ऑरला कार्ता शयन २०२० मधील सहभागी खेळातील पदक षिक देऊन गडूंचा सत्कार खेळाडू व भ ळुंगे-बालेवारड ॉक्टोब Vর'

 प्रास्ताविकात श्री.बकोरिया यांनी खेळाडूंसाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा आणि अर्थसहाय्यची माहिती दिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी राज्यातील 7 खेळाडू आणि 3 पॅरा खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात सिंथेटिक ट्रॅक उभारण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

May be an image of 3 people, people sitting, people standing, indoor and text that says 'महाराष्ट्र राज्य टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील सहश पन गेम्स- जकार्ता २० बीज या खेळातील पारितोषिक देऊन स्थळ म्हाळुंगे- -बालेवाडी'

यावेळी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते शूटिंग प्रशिक्षक सुमा शिरूर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, आर्चरी खेळाडू प्रवीण जाधव, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, अॅथलीट अविनाश साबळे, नौकानयनपटू विष्णू सरावनन, गोल्फपटू उदयन माने, पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी जलतरणपटू सुयश जाधव, नेमबाज स्वरुप उन्हाळकर, अॅथलीट भाग्यश्री जाधव या खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर जकार्ता येथे 2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये ब्रिज या क्रीडा प्रकारात पदक प्राप्त खेळाडू जग्गी शिवदासानी, अजय खरे, राजू तोलानी, हेमा देवरा, गोपीनाथ मन्ना, राजीव खंडेलवाल, हिमानी खंडेलवाल आणि मार्गदर्शक केशव सामंत यांना 20 लाखाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.