वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

असा साजरा करा वाचन प्रेरणा दिन – मराठी भाषा विभागाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई ,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- माजी राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस  15 ऑक्टोबर रोजी या वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध विषयांवरील चर्चासत्र, व्याख्यान, परिसंवाद त्याचबरोबर लेखकांची भेट, वाचक मेळावा आणि अभिवाचन स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या या विविध उपक्रमांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या सर्व व्यासपीठांवर तसेच डिजीटल व्यासपीठावर वेळोवेळी प्रसिद्धी दिली जाणार आहे.

वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम :-

  • दि.14.10.21, वेळ सकाळी 9.00 व्याख्यान विषय : वाचन एक समृद्ध अनुभव, सहभाग श्री.विश्वास सुतार,
  • दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता परिसंवाद विषय: मराठी भाषेचे महत्व व संवर्धन, विषय: वाचाल तर वाचाल, सहभाग : श्री.पुंजाजी मालुंजकर, श्री. बाळासाहेब पलटणे, अॅड. ज्ञानेश्वर गुळवे, श्री विलास पोतदार
  • दुपारी 12.15 वाजता व्याख्यान विषय: बदलती वाचन संस्कृती भविष्यकालीन दिशा, सहभाग : प्रा.डॉ.गणेश मोहिते
  • दुपारी 12.30 वा. व्याख्यान : ग्रंथांच्या सहवासात, श्री. सुनीलकुमार लवटे, सलीम सरदार मुल्ला
  • व्याख्यान : विद्यार्थी आणि वाचन, सहभाग  श्री. राजेंद्र कुमार
  • दि. 16 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. वाचक मेळावा, अभिवाचन व व्याख्यान विषय : वाचन : गरज व फायदे, चला पुस्तकांशी दोस्ती करुया, सहभाग : डॉ.बाळू दुगडूमवार, श्री. विनोद झुंजारे व विद्यार्थी
  • दि. 16. ऑक्टोबर 21, सकाळी 11.00 ऑनलाईन, व्याख्यान विषय : वाचनाचे महत्त्व, डॉ.वीरा राठोड,
  • दि. 16. ऑक्टोबर 21, सकाळी 10.00, व्याख्यान विषय : मला आवडलेले पुस्तक, महाविद्यालयातील युवक,
  • सायं 5.00 : लेखक भेट संवाद विषय : काय वाचायच आणि कशाला वाचायचं, प्रा.डॉ. किशोर सानप,
  • दि. 16. ऑक्टोबर 21, दुपारी 2.30, साहित्य अभिवाचन, पदव्युत्तर मराठी विभागातील विद्यार्थी व अध्यापक,
  • दि. 16. ऑक्टोबर 21, सायं. 5.00 वा. अभिवाचन; डॉ. प्रभाकर देसाई श्री. किरण वैद्य;
  • दि. 16. ऑक्टोबर 21, दुपारी 4 ते 6, संवाद, विषय: संवाद साधुया दिग्गजांशी, डॉ. स्नेहलता देशमुख प्रा. रोहिणी चिंदरकर,
  • दि. 16. ऑक्टोबर 21, सायं. 6.00 वा.  कविता लेखन कार्यशाळा डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी डॉ. सदानंद देशमुख श्री. किशोर बळी,
  • दि. 16. ऑक्टोबर 21, सायं. 6.00 वा. व्याख्यान विषय : वाचू आनंदे, श्री. अशोक अलगोडी,
  • दि. 16. ऑक्टोबर 21, सायं. 5.00 वा. व्याख्यान विषय: कोरोना काळातील वाचनवृद्धी, डॉ.माधवी रायते,
  • दि. 17. ऑक्टोबर 21, सायं. 5.00 वा. व्याख्यान विषय : संस्थांची शतकोत्तर आव्हाने
  • दि. 17. ऑक्टोबर 21, साय. 5.00 वा. विषय : वाचन संस्कृती व्याख्यान, श्री.गजानन श्रीधर नामदेव,
  • दि. 18. ऑक्टोबर 21, सकाळी 10.00 वा. व्याख्यान वाचन संस्कृती, डॉ.व्ही.एन. शिंदे
  • दि. 18. ऑक्टोबर 21, दुपारी 4.00 ते 5.30 वा. विषय : पुस्तक, माणूस, निसर्ग वाचलाच पाहिजे प्रा. मनोज बोरगावकर,
  • दि.18. ऑक्टोबर 21, सायं. 5.00 वा. व्याख्यान विषय : साहित्यातील अनुवादाच्या संधी डॉ. गोपाळ महामुनी ( बेडकीहाळ)

असा साजरा करा वाचन प्रेरणा दिन

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निर्णयास अनुसरुन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने यापूर्वी शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. सध्याच्या कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर या वर्षी “वाचन प्रेरणा दिन” कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/मंडळ, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार

  • ऑनलाईन कार्यक्रम/चर्चासत्रे/प्रशिक्षण ही कोविडच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेता वाचन संस्कृती वाढीस लागण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे.
  • जिथे प्रत्यक्षरीत्या कार्यक्रम करणे शक्य आहे तिथे केंद्र शासन/राज्य शासन यांनी आखून दिलेल्या कोविड मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
  • व्हॉटसअॅप WhatsApp),इंटरनेट (Internet), फेसबुक(Facebook), टिव्टर(Twitter) अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती वृध्दींगत होईल /वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावेत.
  • मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी डिजीटल माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करुन मराठीतील साहित्य स्वयंस्फुर्तीने वाचकांना पाठवावे.
  • सर्व संस्थांनी सोशल मीडियावर “मराठी वाचन कट्टा निर्मिती करावी.
  • “वाचन संस्कृती” वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांना मराठी भाषेशी संलग्न रोजगाराच्या संधीची माहिती या दृष्टीने रोजगारभिमुख चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. उदा. व्यवसायिक लेखक कसे बनावे, अनुवाद कसा करावा,संहिता लेखन, गीत लेखन इत्यादी.
  • सर्व संस्थांनी आपल्या स्तरावर मराठी डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करावे.
  • विकीपीडीया सारख्या माध्यमावर मराठीत जास्तीत जास्त लेखन व्हावे याकरीता यासंबधीच्या कार्यशाळा आयोजीत करण्यात याव्यात.
  • (सर्व क्षेत्रीय कार्यालये) यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी प्रचार प्रसार/वाचन संस्कृतीच्या विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे.
  • मराठी अभिजात दर्जाबाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाच्या समन्वयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे.