नुकसान ग्रस्त नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या भेटी घेत आमदार अंबादास दानवे यांनी दिला दिलासा

गंगापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना आमदार अंबादास दानवे यांनी केले जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, संसारोपयोगी साहित्याचे वाटप

औरंगाबाद,१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-शिवसेना प्रवक्ते व  जिल्हाप्रमुख विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी तालुक्यातील ढोरेगाव, सोलेगाव, पुरी , पिंपळवाडी या गावातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली, नुकसान ग्रस्त नागरीकांच्या, शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना धीर देऊन दिलासा दिला.

अतिवृष्टीमुळे व औरंगाबाद जिल्ह्यात सततच्या संततधार कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याने भयंकर रौद्ररुप धारण केल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील सर्व नद्यांसह पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले,शिवना नदीने तर धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुराचे पाणी गावांमध्ये शिरल्याने घरांचे, दुकानांचे अतोनात नुकसान झाले. शेतीसह,अन्नधान्य,पाळीवप्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन ,तूर, कपाशी, बाजरी ,मका आदी सह सर्वच हंगामी पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला असून शिवना नदीच्या काठावरील अनेक गाव वस्त्यांवरील नागरिक बेघर झाले आहेत

शिवसेना, शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीर उभा असून आपण हाक द्या शिवसेना आपल्या मदतीसाठी कायम आपल्या तयार आहे असे आश्वासन दिले एवढ्यावरच न थांबता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्या नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे अशा कुटुंबांना त्वरित किराणा सामान व जीवनावश्यक वस्तू ,संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आज प्राथमिक स्वरूपात जीवनावश्यक वस्तू, संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या असून ही मदत नसून हे आमचे कर्तव्य समजतो. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा प्रश्न विधान परिषदेत मांडून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त व लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी तहसीलदार सोनी ,गट विकास अधिकारी परदेशी , शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील ,कृष्णा पाटील डोणगावकर, तालुका प्रमुख दिनेश मुथा जिल्हा परिषद सदस्य दिलीप निरफळ तलाठी अमोल काळे,कृषी विभागाचे मोरे साहेब पंचायत समिती सभापती सुनीलजी केरे , उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, नगरसेवक आबासाहेब शिरसाठ भाग्येश गंगवाल काकासाहेब गायकवाड कारभारी दुबिले गोकुळ तांगडे अविनाश ईस्टके दिलीप शिंदे मधुकर मोरे कैलास पवार बद्रीनाथ शिंदे गणपत मोरे भाऊसाहेब मोरे नानासाहेब राऊत ज्ञानेश्वर मोरे दत्तू पवार, श्रीलाल गोविंद वल्ले, लक्ष्मण बहिर, करण खोमणे ,विष्णू पोटे ,कलीम शेख, अशोक मस्के, धोंडीराम पठाडे ,गणेश मस्के, हरी शिंदे ,दादा शिंदे आदीसह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.