पुढे आलेले आव्हानं माणसाच्या सर्वोच्च क्षमतांची परीक्षा घेणारे-महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम

” पुन्हा एकदा एव्हरेस्ट” या पुस्तकाचे प्रकाशन

औरंगाबाद, १० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- येथील  मिशन गो फॉर सेव्हण समिट एक्सपीडेशन  आणि इंडियन कॅडेट फॉर्स आयोजित ” पुन्हा एकदा एव्हरेस्ट” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिनांक 9 ऑक्टोबर २०२१ रोजी   विनोबा भावे सभागृहात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती श्री. अंकुशराव कदम , प्रमुख पाहुणे म्हणून माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर ,  मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या सचिव कल्पलता भारस्ववाडकर पाटील , कमांडर विनोद नरवडे ,  प्राचार्य डॉक्टर शत्रुंजय कोटे , वृत्तपत्र आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रेखा शेळके , डॉक्टर शशिकांत सिंग आणि विद्या बुक्स पब्लिकेशनचे शशिकांत पिंपळापुरे आदी मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर पुरुषोत्तम भापकर माजी विभागीय आयुक्त यांनी मनीषा च्या साहसी प्रवासाबद्दल माहिती सांगून तिचे अभिनंदन केले.

Manisha Waghmare conquers Mt Everest on second attempt

अध्यक्षीय समारोप करताना अंकुशराव कदम यांनी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेतील प्रवासाचे काही थरारक अनुभव सर्वांना सांगितले. शिखर माथ्यापासून 170 मीटर अंतर बाकी असताना  निसर्गाने रौद्र रूप धारण केली आणि तिला कशा पद्धतीने खाली परत यावे लागले याबद्दल सर्वांना सांगितले तसेच जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय आणि स्वप्न प्रत्येक गिर्यारोहक उराशी बाळगून असतो. प्राध्यापक मनीषा वाघमारे यांनी देखील या ध्येयाने प्रेरित होऊन एव्हरेस्टवर चढाई केली.  निसर्गाने धारण केलेले रौद्र रूप, शरीराचा थरकाप उडवणारे उने 40 अंश तापमान, ऑक्सिजनचा तुटवडा आणि जीवघेण्या प्रसंगामुळे शिखर माथा पासून अवघे 170 मीटर बाकी असताना माघारी फिरावे लागले. पुढे आलेले आव्हानं माणसाच्या सर्वोच्च क्षमतांची परीक्षा घेणारे असतात. अवघ्या एका वर्षाच्या आत शारीरिक, मानसिक, तांत्रिक आणि आध्यात्मिक विचार स्वतःला अपार मजबूत बनवून हिमालयाच्या त्या विपरीत वातावरणात पुन्हा एकदा 21 मे 2018 रोजी एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवल आणि मराठवाड्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके, प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर शत्रुंजय कोटे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

मनीषा वाघमारे एव्हरेस्ट शिखरावर - manisha waghmare on everest peak |  Maharashtra Times

पुन्हा एकदा एवरेस्ट या पुस्तकाच्या लेखिका एव्हरेस्टवीर प्राध्यापिका मनीषा वाघमारे यांनी पुस्तकाचा सारांश त्यांच्या साहसी प्रवासाचे अनुभव सर्वांना सांगितले. या पुस्तकाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये साहसी खेळांना चालना देण्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा दिक्षित आणि कार्यक्रमाचे आभार डॉ. राहुल श्रीरामवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. शशिकांत सिंग, श्री अमित बेलकर, श्री रोहन श्रीरामवार, श्री. दीपक वटाणे, श्री. शुभम भावसार, श्री. सुजित इंगळे आणि माधवी बेलकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.